T20 World Cup : टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी, बुमराह अन् पटेल फिट

भारतीय संघ T20 World Cup साठी या आठवड्यात जाहीर होणार आहे यासाठी भारताचे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त आहेत.
Jasprit Bumrah-Harshal Patel Fit Team India T20 World Cup
Jasprit Bumrah-Harshal Patel Fit Team India T20 World Cupsakal
Updated on

Jasprit Bumrah-Harshal Patel Fit Team India T20 World Cup : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल आता पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार गुरुवारी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार असून या दोन वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन पूर्णपणे निश्चित आहे.

आशिया कपमध्ये दुखापतींमुळे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल टीम इंडियाचा भाग होऊ शकले नाहीत. टीम इंडियाला या दोन गोलंदाजांची खूप उणीव भासली आणि ती अंतिम फेरीत पात्र न ठरताच बाद झाली. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्यांची तंदुरुस्ती वर काम केले आहे. क्रिकबझचा दावा आहे की दोन्ही खेळाडू पूर्ण फिट झाली आहे.

Jasprit Bumrah-Harshal Patel Fit Team India T20 World Cup
Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

बुमराह आणि पटेल शिवाय विश्वचषक संघात आणखी अनेक बदल होण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक संघाबाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागी अक्षर पटेल संघात संधी मिळू शकते. टी-20 विश्वचषकसाठी युजवेंद्र चहल टीम इंडियाचा मुख्य फिरकी गोलंदाज असणार आहे. आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांना टीम इंडियात स्थान मिळू शकते.

Jasprit Bumrah-Harshal Patel Fit Team India T20 World Cup
India Legends ची विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक

आशिया कपमध्ये भुवनेश्वर कुमारशिवाय अर्शदीप आणि आवेश खान यांनाही संधी देण्यात आली होती. आवेश खान संघाबाहेर होणार हे नक्की आहे. दुसरीकडे टीम इंडियाने मोहम्मद शमीवर विश्वास ठेवला तर अर्शदीप सिंगलाही बाहेर बसावे लागू शकते. दीपक हुडाच्या जागी संघ पक्की मानला जात आहे. पण ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकाला टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकते. केएल राहुल बॅकअप विकेटकीपर म्हणून टीम इंडियामध्ये उपस्थित राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.