Jasprit Bumrah-Sanjana Ganesan : जसप्रीत बूमराहला झाले 'पुत्ररत्न', मुलाला दिले रामायणातील योद्ध्याचे नाव

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan Become Parents To Boy Name Him Angad Ahead Of Asia Cup 2023 cricket news in marathi kgm00
Jasprit Bumrah And Sanjana Ganesan Become Parents To Boy Name Him Angad Ahead Of Asia Cup 2023 cricket news in marathi kgm00 sakal
Updated on

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने झालेला आंनद बुमराहने सर्वांसोबत शेअर केला आहे.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी घरातील छोट्या पाहुण्याचे नाव अंगद ठेवलं आहे. म्हणजे बुमराह आणि संजना मुलगा अंगदचे आई-वडील झाले आहेत.

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan Become Parents To Boy Name Him Angad Ahead Of Asia Cup 2023 cricket news in marathi kgm00
Asia Cup Competition : संपूर्ण आशियाई स्पर्धेवर पावसाचे सावट; भारत नेपाळ आज सामना

यापूर्वी 3 सप्टेंबरला जसप्रीत बुमराह आशिया कप सोडून भारतात परतल्याची बातमी आली होती. या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुमराहला काय झाले असेल यावर विविध अंदाज बांधले गेले. आशिया कपमध्ये एकही षटक न टाकता तो भारतात का परततोय? पण आता याचे उत्तर सर्वांसमोर आहे. बुमराह पहिल्यांदाच बाबा बनणार आहे, त्यामुळे तो भारतात आला होता.

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan Become Parents To Boy Name Him Angad Ahead Of Asia Cup 2023 cricket news in marathi kgm00
Team India : पाकिस्तानविरुद्ध इशान किशनचं दमदार अर्धशतक, KL राहुलचा पत्ता कट?

जसप्रीत बुमराहने बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने एक्स-हँडलवर लिहिले की, आमचे छोटे कुटुंब आता थोडे मोठे झाले आहे. अंगद जसप्रीत बुमराह आमच्या घरी आला आहे आणि यासोबतच आमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे.

भारतीय गोलंदाज बुमराहच्या या ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की तो 4 सप्टेंबरला सकाळी बाबा झाला आणि संजना गणेशन आई झाली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.