Jasprit Bumrah: बुमराहने टी-20 कर्णधार म्हणून रचला अनोखा इतिहास! धोनी अन् सेहवागच्या धाकड क्लबमध्ये सामील

Jasprit Bumrah T20I Captaincy Debut Record
Jasprit Bumrah T20I Captaincy Debut Record
Updated on

Jasprit Bumrah T20I Captaincy Debut Record : स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल 11 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना त्याने संघाला विजय तर मिळवून दिलाच पण स्वत:ही अप्रतिम कामगिरीही केली.

बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीला (4) तर लॉर्कन टकरला (0) धावांवर बाद केले. बुमराहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पदार्पणात एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्येही एन्ट्री मारत एक अनोखा इतिहास रचला आहे.

Jasprit Bumrah T20I Captaincy Debut Record
Asia Cup 2023: दिल्लीतून हलणार आशिया कपचे सूत्र! रोहित शर्माच्या उपस्थित लवकरच होणार संघाची घोषणा

बुमराह हा पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे, ज्याने टी-20 मध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. बुमराहच्या आधी 8 भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कर्णधारपदाच्या पहिल्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला, परंतु त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही.

भारतीय कर्णधार म्हणून पहिला टी-20 सामना जिंकणारा बुमराह हा नववा खेळाडू आहे. सेहवाग हा पहिला कर्णधार आहे. त्याने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात ही कामगिरी केली होती. टीम इंडियाचा हा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. धोनीशिवाय सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पांड्या, केएल राहुल यांची नावे कर्णधार म्हणून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहेत.

Jasprit Bumrah T20I Captaincy Debut Record
Asia Cup 2023 : आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठा धोका, जाणून घ्या कारण

बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 139/7 पर्यंत रोखले. यजमानांसाठी बॅरी मॅकार्थीने 33 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 6.5 षटकांत 47/2 धावा केल्या आणि पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजेता घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.