Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहला संघाचे ट्रम्प कार्ड मानले जात आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या फिटनेसकडे लागल्या आहेत.
दरम्यान, खुद्द बुमराहने त्याच्या तयारीबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच संघात पुनरागमन करू शकेल, अशी अपेक्षा आहे. बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. अलीकडेच तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही दिसला नाही आणि या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.
जसप्रीत बुमराहने भारतीय क्रिकेट संघाला टॅग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो बेंगळुरू येथील एनसीएमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरही हसू आहे. तसेच बॅकग्राऊंडमध्ये गाणे वाजते आहे. आय एम कमिंग होम…!
अशा परिस्थितीत तो लवकरच आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळताना दाखवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. तो ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून परतण्याची अपेक्षा आहे.
जसप्रीत बुमराहने कोणतीही घाई करू नये असे संघ व्यवस्थापनाला वाटते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा विश्वचषक भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. 2011 पासून संघाला विश्वचषक विजेतेपद मिळवता आलेले नाही. याशिवाय काही खेळाडू आधीच जखमी आहेत. त्यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, उमेश यादव यांच्यासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत संघाने यजमानांचा डावाने पराभव केला. दुसरी आणि अंतिम कसोटी 20 जुलैपासून होणार आहे. यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 वनडे आणि 5 टी-20 सामने होतील. टी-20 चे 2 सामने अमेरिकेत खेळल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.