Jasprit Bumrah Fitness : भारताचे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता टीम इंडिया टी 20 वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारताने अजून आपला वर्ल्डकप टी 20 चा संघ जाहीर केलेला नाही. भारत आपला वर्ल्डकपसाठीचा टी 20 संघ 16 सप्टेंबरला घोषित करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अजूनही चिंतेचे वातावरण आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा 16 सप्टेंबरला होऊ शकते. दरम्यान, दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत आजून चिंतेचे वातावरण आहे. जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. जर तो टी 20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊ शकला नाही तर भारतासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.
जसप्रीत बुमराह बरोबरच वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. या दोघांनाही संघ निवडीपूर्वी आपला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. यासाठी या दोघांनाही बंगळुरूच्या एनसीएमध्ये बोलवण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचा आढावा या आठवड्यात घेण्यात येईल. त्यानंतर तो दुखापतीतून कितपत सावरला आहे याचा अंदाज येईल. बुमराह इंग्लंड दौऱ्यानंतर पाठदुखीने त्रस्त होता. इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराह भारतीय संघात दिसलेला नाही. दुसरीकडे हर्षल पटेलने देखील गोलंदाजीचा सराव करण्यास सुरूवात केली आहे. तो संघात परतेल अशी सर्वांना आशा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.