बाऊन्सरच्या माऱ्यानंतर बुमराह-अँडरसनमध्ये शाब्दिक चकमक
Ind vs Eng Test: क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर (Lord's) भारताने इंग्लंडचा १५१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्या पलटणारा क्षण ठरला तो बुमराह आणि अँडरसन (Bumrah Anderson Fight) यांच्यातील राडा. चाहत्यांचे मनोरंजन होईल याची पुरेपूर काळजी दोन्ही संघांनी घेतली. भारताचा (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने इंग्लंडच्या (England) अँडरसनला टाकलेले बाऊन्सर (Bouncer) आणि त्यानंतर त्यांच्यात झालेली बाचाबाची (Verbal Spat) हा प्रकार सामन्याची दिशा बदलणारा ठरला. अँडरसनला (James Anderson) टाकलेल्या बाऊन्सर्सचा बदला (Revenge) घेण्यासाठी इंग्लंडने बुमराहवर बाऊन्सर्सचा मारा केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट बुमराह आणि शमी जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर अखेर तिसऱ्या कसोटीच्या आधी अँडरसनने राड्याविषयी मौन (Reaction) सोडलं. त्यावेळी नक्की काय झालं याबद्दल त्याने पॉडकास्टमध्ये माहिती दिली.
"बुमराहच्या बाऊन्सर्समुळे अचानक गांगरून गेलो. कारण मैदानातून माघारी येणारे आमचे फलंदाज सांगत होते की पिच खूपच संथ आहे. चेंडू वेगाने येत नाहीये. मी जेव्हा फलंदाजीसाठी गेलो तेव्हा ते मला लगेचच जाणवलं. बुमराहने बाऊन्सर टाकला पण तो नेहमीच्या वेगाने आला नाही. पण असं असलं तरी तो माझ्या शरीराच्या रेषेत होता, त्यामुळे मला चेंडू खेळायला त्रास झाला. जो रूटनेही मला सांगितलं होतं की बुमराह नेहमीपेक्षा कमी वेगाने गोलंदाजी करतो आहे. पण जेव्हा बुमराहने मला गोलंदाजी केली, त्यावेळी तो केवळ मला बाद करण्याचाच प्रयत्न करत होता", असं सांगत अँडरसनने या वादावर एका अर्थी पडदा टाकला.
अँडरसन-बुमराहमध्ये काय झाला राडा?
बुमराहने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनवर बाऊन्सरची बरसात केली. त्यामुळे अँडरसन चांगलाच खवळला. ते साऱ्यांनीच टीव्हीवरील लाईव्ह प्रक्षेपणात पाहिलं पण त्यानंतर नक्की काय घडलं? ते आर अश्विन आणि श्रीधर यांनी सांगितलं. बुमराहने अचानक अँडरसनवर वेगवान बाऊन्सरची बरसात सुरू केल्यानंतर अँडरसनने बुमराहला थेट सवाल केला की तू इतका वेगाने गोलंदाजी का करतो आहेस? तुला मी अशी गोलंदाजी केली होती का? त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराहने अँडरसनची माफी मागितली पण अँडरसन मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे बुमराह अधिकच खवळला आणि त्यातूनच पाचव्या दिवशी त्याने दमदार फलंदाजी व गोलंदाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.