India Vs Australia 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज ( दि. 23) नागपूर येथे होणार आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने ते तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडीवर आहेत. आजचा सामना भारतासाठी मालिका वाचवण्यासाठी जिंकणे खूप गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 208 धावा करून देखील पराभव झाला होता. या सामन्यात भुवनेश्वर कुमार सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला होता. स्लॉग ओव्हरमध्येही भुवनेश्वर कुमारला धावा रोखण्यात अपयश आले होते. (Jasprit Bumrah May Come Back in Team Who Will He Replace Bhuvneshwar Kumar Harshal Patel Or Umesh Yadav)
पहिल्या सामन्यात भारताचा अव्वल गोलंदाजी अटॅक खेळवला नव्हाता. भारताचे प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमराहला पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. मात्र तो दुसऱ्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. जसप्रीत बुमराह अंतिम 11 मध्ये परतला तर पहिल्या सामन्यात खेळलेल्या भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल किंवा उमेश यादव यांच्यापैकी एकाचा संघातून पत्ता कट होऊ शकतो. भारत सध्या तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू घेऊन मैदानात उतर आहे. हार्दिक पांड्या हा अतिरिक्त गोलंदाजाची भुमिका बजावत आहे.
बुमराह आणि पटेल हे दुखापतीतून सावरत संघात परतले आहेत. हर्षल पटेलला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली मात्र त्याने 4 षटकात 49 धावा दिल्या. हर्षल पटेल हा दुखापतीतून सावरत पुन्हा संघात आला आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात तो पूर्ण लयीत दिसेल याची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. हर्षल पटेल हा नव्या चेंडूसोबतच स्लॉग ओव्हरमध्येही प्रभावी मारा करू शकतो.
दुसरीकडे टी 20 क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार हा स्ट्राईक बॉलरची भुमिका बजावतो. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र टी 20 वर्ल्डकपच्या संघात भुवनेश्वर कुमारला स्थान देण्यात आल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत सातत्याने संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत जर जसप्रीत बुमराहसाठी जागा खाली करण्याची वेळ उमेश यादववरच येऊ शकते.
उमेश यादव हा मोहम्मद शमीच्या जागेवर संघात आला आहे. त्याने तीन वर्षानंतर टी 20 संघात स्थान मिळवले. मात्र ऑस्ट्रेलियाविरूद्धची त्याची सुरूवात खराब झाली. ग्रीनने त्याच्या पहिल्याच षटकता सलग चार चौकार मारले होते. मात्र त्यानंतर त्याने पुनरागमन करत एकाच षटकात दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर नेले होते. परंतू त्याला बुमराहसाठी जागा रिकामी करून द्यावी लागणार आहे असे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.