Jasprit Bumrah Video : भरतचा सल्ला रोहितने ऐकला अन् बुमराहनं मैदानावरच हात आपटला... DRS चा काय किस्सा झाला?

India Vs England 1st Test : जसप्रीत बुमराहने तीव्र नाराजी व्यक्त केली मात्र पुढच्याच षटकात विकेट घेत कर्णधाराला दिला मोठा दिलासा
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah esakal
Updated on

Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या दिवशी दमदार गोलंदाजी केली. त्याने रिव्हर्स स्विंगचे उत्तम वापर करत इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलेच दमवले. त्याने इंग्लंडच्या 47 धावा करणाऱ्या बेन डकेटला अन् 2 धावा करणाऱ्या जो रूटला बाद केलं.

बुमराहच्या या भेदक माऱ्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच सुखावला असणार. कारण डकेट आणि ऑली पोपने दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली होती. मात्र बुमराह रोहितवर चांगलाच नाराज झाला होता. ज्यावेळी डकेट आणि पोप यांची भागीदारी फुलत होती त्यावेळी बुमराहने डकेला एक उत्कृष्ट चेंडू टाकत पायचित पकडलं. त्याने जोरदार अपिल देखील केली. अंपायरने ती अपिल फेटाळली.

त्यानंतर बुमराह रोहित शर्माकडे आशेने पाहत होता की रोहित डीआरएस घेईल आणि माझं विकेट्सचं खातं उघडंल जाईल. मात्र प्रथेप्रमाणे रोहितने विकेटकिपर केएस भरतकडे पाहिले. भरतने रोहितला डीआरएस न घेण्याचा सल्ला दिला. मात्र रिप्लेमध्ये डकेट बाद होत असल्याचे दिसले. त्यानंतर जसप्रीत बुमराह चांगलाच भडकला. त्याने हातवारे करत रोहितकडे नाराजीचा सूर लावला. तसेच मैदानावर हात आपटत निराशा व्यक्त केली.

बुमराहला बेन डकेटला पायचित पकडता आलं नाही. मात्र त्यानं पुढच्याच षटकात डकेटचा काटा काढला. त्यानं 47 धावांवर त्रिफळा उडवत त्याचं अर्धशतक पूर्ण होऊ दिलं नाही. याचबरोबर बुमराहने रूटला देखील 2 धावांवर बाद करत भारताची सामन्यावरील पकड मजबूत केली. त्यानंतर इंग्लंडचा डाव घसरला.

केएस भरतने पुन्हा एकदा डीआरएसचा गोंधळ घातला. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रोहितला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. मात्र चेंडू हा ऑफ स्टम्पच्या खूप बाहेर होता. त्यामुळे भारताचा एक रिव्ह्यू वाया गेला. त्यावेळी देखील रोहितने नाराजी व्यक्त करत काय विचार करून हा रिव्ह्यू घेतला असं भरतला विचारलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.