Jasprit Bumrah : भारतासाठी वर्ल्डकपपूर्वी धोक्याची घंटा; बुमराहचा अजूनही फिटनेस इश्यू?

Jasprit Bumrah Not Playing in 1st T20 Against Australia In Mohali Question Mark On Fitness
Jasprit Bumrah Not Playing in 1st T20 Against Australia In Mohali Question Mark On Fitnessesakal
Updated on

Jasprit Bumrah India Vs Australian 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा मोहालीत खेळवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी असलेल्या मोहालीत भारताची ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणारी अंतिम प्लेईंग 11 या सामन्यात उतरेल असे वाटले होते. मात्र ज्यावेळी संघाची घोषणा झाली त्यावेळी चाहत्यांना एक मोठा धक्का बसला. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळणार नाहीये. यामुळे जसप्रीत बुमराह अजून फिट झाला आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली.

Jasprit Bumrah Not Playing in 1st T20 Against Australia In Mohali Question Mark On Fitness
IND vs AUS 1st T2O : वेडची झुंंजार खेळी; भारताचा तोंडचा घास पळवला

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यासाठी आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. यावेळी संघात जसप्रीत बुमराहचे नाव नाही हे ऐकताच चाहत्यांच्या भारतीय संघाच्या चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रोहितने जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यासाठी का खेळणार नाही याचे कारण सांगितले.

Jasprit Bumrah Not Playing in 1st T20 Against Australia In Mohali Question Mark On Fitness
Ravi Bishnoi : T20 वर्ल्डकप संघात स्थान न मिळालेल्या बिश्नोईची इन्स्टा स्टोरी आली चर्चेत

रोहित शर्मा म्हणाला की, 'जसप्रीत बुमराह गेम ब्रेक घेणार आहे. तो शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात खेळेल.' रोहितच्या या उत्तरावर बुमराह अजून फिट झाला आहे की नाही याबाबतची शंका जास्तच बळावली. कारण पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेला बुमराह बऱ्याच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. तो जर दुखापतीतून सावरला असेल तर त्याच्यासाठी वर्ल्डकपपूर्वी जास्तीजास्त सामने खेळणे गरजेचे आहे. या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्धच्या प्रत्येकी 3 टी 20 सामन्यांची मालिका एक चांगली संधी आहे.

जसप्रीत बुमराह बरोबरच ऋषभ पंतला देखील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात संधी मिळालेली नाही. त्याच्या ऐवजी डावखुरा फलंदाज म्हणून अक्षर पटेलची चाचपणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()