Jasprit Bumrah Ben Stokes : बुमराहच्या चेंडूवर स्टोक्सनं बॅटच सोडली, 150 वी शिकार करत उपकर्णधाराचा पंजा

Jasprit Bumrah Ben Stokes :
Jasprit Bumrah Ben Stokes
Jasprit Bumrah Ben Stokes esakal
Updated on

Jasprit Bumrah Ben Stokes : भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरूद्ध तिखट मारा केला. त्याने इंग्लंडच्या रथी महारथींची विकेट घेतली. त्याने ओली पोपचा उडवलेला त्रिफळा हा चर्चेचा विषय ठरला. मात्र चहापानानंतर कर्णधार बेन स्टोक्सने टेन्शन वाढवले होते. त्यात रोहितनं त्याला जीवनदान दिलं होतं.

मात्र उपकर्णधाराने कर्णधाराची लाज वाचवली. त्याने स्टोक्सचा 47 धावांवर त्रिफळा उडवला. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात टॉम हार्टलीला 21 धावांवर बाद करत आपला पंजा पूर्ण केला. याचबरोबर त्याने आपल्या 150 विकेट्स देखील पूर्ण केल्या.

Jasprit Bumrah Ben Stokes
Ind vs Eng : भारताचे फलंदाज फिरकी खेळायला विसरले? इंग्लंडविरूद्धची आकडेवारीच सांगते सर्वकाही

भारताने इंग्लंडचे 7 फलंदाज माघारी धाडले होते. मात्र इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स क्रिजवर ठाण मांडून बसला होता. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे स्टोक्स तळातील फलंदाजांना साथीला घेत भारताची डोकेदुखी वाढवत होता.

दरम्यान, रोहित शर्माने 45 व्या षटकात बेन स्टोक्सला जीवनदान दिलं. त्याने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेल सोडला. याचा फायदा उचलत स्टोक्सने हार्टली सोबत जवळपास अर्धशतकी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र बुमराहने रोहितची लाज वाचवत स्टोक्सचा 47 धावांवर त्रिफळा उडवला.

Jasprit Bumrah Ben Stokes
Pakistan Hockey Crisis : सहा महिन्यापासून पगार नाही... पाकिस्तानचे हॉकी खेळाडू संघ व्यवस्थापनाशी भिडले

स्टोक्स बाद झाल्यानंतर बुमराहनेच इंग्लंडचा डाव संपवला. त्याने आपल्या कसोटीतील 150 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने हार्टलीला 21 तर जेम्स अँडरसनला 6 धावांवर बाद केले. इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर संपला. भारताकडे आता पहिल्या डावात 143 धावांची आघाडी आहे. भारत आज दिवसाची उरलेली 11 षटके खेळण्यासाठी मैदानात उतरले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.