Jasprit Bumrah Birthday : बुमराहचा बर्थडे; संजना झाली रोमँटिक

जसप्रीत बुमराहला पत्नी संजनाने दिल्या रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा
jasprit bumrah sanjana ganesan
jasprit bumrah sanjana ganesanesakal
Updated on

अहमदाबादमध्ये ६ डिसेंबर १९९३ ला एका अशा मुलाचा जन्म झाला ज्याने पुढे जाऊन वेगावान गोलंदाजीचा भारताचा इतिहास एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. हा भारताचा वेगवान गोलंदाज म्हणजे जसप्रीत बुमराह! ( Jasprit Bumrah Birthday ) जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) आज वाढदिवस आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहणाऱ्या जसप्रीत बुमराहला नेटकरी सोशल मीडियावर वाढ दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र या सर्वांमध्ये त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिने जसप्रीत बुमराहला दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

संजना गणेशनने (Sanjana Ganesan) सोशल मीडियावर जसप्रीत बुमराह आणि स्वतःचा एक रोमँटिक अंदाजात फोटो शेअर केला आहे. त्याला तिने 'तुझ्या बाजूला जेथे कायम मला रहायला आवडतं... माझे संपूर्ण ह्रदय व्यापून टाकणाऱ्या, हॅप्पी बर्थडे!' असे रोमँटिक कॅप्शनही दिले. त्याला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दोन हार्ट वाल्या इमोजीची कमेंट दिली.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक टीव्ही प्रेझेंटर आहे. अनेक क्रिकेटविषयक टीव्ही शो ती होस्ट करत असते. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनने १५ मार्च २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. संजना टी २० वर्ल्डकपदरम्यान आयसीसीसाठी अँकरिंग करताना दिसली होती.

जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आतापर्यंतच्या आपल्या कसोटी कारकिर्दित २४ सामन्यात १०१ विकेट घेतल्या आहेत. तर ६७ एकदिवसीय सामन्यात १०८ आणि ५५ टी २० सामन्यात ६६ विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने २०१३ ला आपले आयपीएल ( IPL ) पदार्पण केले होते. तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.

आता नुकत्याच झालेल्या रिटेंशन प्रक्रियेदरम्यान मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) या गुणी वेगवान गोलंदाजाला १२ कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे. याचबरोबर मुंबई इंडियन्सने १६ कोटी देऊन रोहित शर्माला ( Rohit Sharma ) तर ८ कोटी देऊन सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) रिटेन केले आहे. मुबईने कायरन पॉलार्डच्या रुपात एकमेव विदेशी खेळाडूला रिटेन केले आहे. त्याला मुंबई इंडियन्सने ६ कोटी रुपये दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.