'एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा...'; पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटरची PM मोदींवर जहरी टीका

'एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा...'; पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटरची PM मोदींवर जहरी टीका
Updated on

Javed Miandad Slams PM Modi : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोगदार टीका केली आहे. मियांदाद म्हणाले की मोदी पूर्णपणे वेगळ्या मार्गावर आहेत आणि एक दिवस येईल जेव्हा त्यांच्याच धर्मातील लोक त्यांना मारतील. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट भारतीय क्रिकेटपेक्षा चांगले आणि शक्तिशाली असल्याचा दावा मियांदादने केला.

'एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा...'; पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटरची PM मोदींवर जहरी टीका
ENG vs AUS : बेन स्टोक्सचा चक्रव्यूह अन् उस्मान भाईचा करेक्ट कार्यक्रम पाहा Video

आशिय कपमुळे दोन्ही देशाच्या क्रिकेट बोर्डामध्ये बराच वादी वाद झाला. आशिया कप 2023 चे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे, पण भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नाही. 9 सामने श्रीलंकेत तर 4 सामने पाकिस्तानात होणार आहेत. 2023 चा विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपले सर्व सामने तिथेच खेळावे लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर मियाँदाद यांनी आपलं मत व्यक्त केले आहे.

'एक दिवस त्यांच्याच धर्मातील लोक त्यांचा काटा...'; पाकच्या माजी दिग्गज क्रिकेटरची PM मोदींवर जहरी टीका
WI vs IND : WTC पराभवानंतर पुजाराने घेतला मोठा निर्णय! वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर सोडणार टीम इंडियाची साथ

जावेद मियांदाद पुढे म्हणाले, 'जर विश्वचषकचे नियोजन माझ्या हातात असेल तर मी भारतात जाण्यास नकार दिला असता. जोपर्यंत भारत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही इथे खेळण्यासाठी येणार नाही. पूर्वी असे व्हायचे की एक वर्ष ते यायची एक वर्ष आम्ही जायचो. पण ते ज्या पद्धतीने वागत आहेत आणि विशेषत: या मोदींनी ते उद्ध्वस्त केले आहे. त्याला आता देशही उद्ध्वस्त करायचा आहे, अशी वेळ येईल जेव्हा त्यांचीच माणसे मोदींना मारतील. कारण ते पूर्णपणे वेगळ्या मार्गाने जात आहेत.

जावेद मियांदाद पुढे म्हणाले, 'खेळ ही एक अशी गोष्ट आहे, जी दोन देशांना जोडते आणि तुमचे नाते घट्ट होते. त्यामुळे मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, जोपर्यंत भारत येऊन आमच्यासोबत खेळत नाही, तोपर्यंत आम्हाला तिथे जाऊन खेळण्याची गरज नाही. आमचे क्रिकेट त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा वरचढ आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. नरकात जा अशी टिका मियाँदाद यांनी केली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आशिया चषक 2023 चे आयोजन करणार आहे. तथापि, तो हायब्रीड मॉडेलवर खेळला जाईल आणि त्याचे बहुतेक सामने श्रीलंकेत होतील. या स्पर्धेतील केवळ चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत, तर या स्पर्धेतील नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.