IND vs PAK Schedule : जय शहांनी केलं शिक्कामोर्तब... भारत - पाकच नाही तर इतर सामन्यांचेही वेळापत्रक बदलणार

ODI World Cup 2023 Schedule
ODI World Cup 2023 Scheduleesakal
Updated on

ODI World Cup 2023 IND vs PAK Schedule : ऑक्टोबर महिन्यापासून भारतात सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील काही सामन्यांची तारीख बदलणार आहे. यावर खुद्द बीसीसीआय सचिव जय शहा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यावेळी सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली होती.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जय शहांनी ही विनंती मान्य केली असून वनडे वर्ल्डकप 2023 मधील काही सामन्यांच्याची तारीख बदलण्यात येईल. यात भारत पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्याचा देखील समावेश आहे. (India Vs Pakistan Schedule)

ODI World Cup 2023 Schedule
WI vs IND 1st ODI : भारताचा पहिल्या सामन्यात विजय मात्र 115 धावात निम्मा संघ झाला गारद

भारत आणि पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यादिवशीच नवरात्रीचा पहिला दिवस येतो. हा सामना होणाऱ्या गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गुजराजमध्ये गरबा खेळण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. त्यातच भारत - पाकिस्तान सामना आयोजित केला तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

यामुळे सुरक्षा एजन्सींनी या सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला होता. त्यानंतर आज जय शहा यांनी दिल्लीत बीसीसीआयची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही राज्य संघटनांनी सामन्याची तारीख बदलावी अशी सुचना केली.

ODI World Cup 2023 Schedule
SL vs PAK : पाकिस्ताननं श्रीलंकेला लोळवत इतिहास रचला; WTC Point Table मध्येही भारतापेक्षा वरचढ

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जय शहा भारत पाकिस्तानसह वर्ल्डकपमधील काही सामन्यांची तारीख बदलण्यास तयार झाले आहे. याची घोषणा जय शहा यांनी आज केली आहे. जरी भारत पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली जाणार असली तरी सामना हा अहमाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.