Jasprit Bumrah Fitness Update : भारत ऑगस्ट महिन्यातील आयर्लंड दौऱ्यावर भारताचा दुय्यम संघ पाठवण्याची शक्यता आहे. मात्र हा दौरा बीसीसीआय आणि टीम इंडियासाठी महत्वाचा असणार आहे. याच दौऱ्यावर दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंच्या मॅच फिटनेसचा चाचपणी होणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अपडेट दिली. त्यांच्या मते बुमराह सध्या एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे. त्याच्या लोव्हर बॅकवर स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे शस्त्रक्रिया झाली होती.
जसप्रीत बुमराह भारतीय संघात परतण्यापूर्वी काही सराव सामने खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्या आयर्लंड दौऱ्यावर पाठवायचं की नाही याची निर्णय घेण्यात येईल.
जय शहा यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला आहे आणि तो शक्यतो आयर्लंड दौऱ्यावर जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह वर्ल्डकपपूर्वी 12 वनडे सामने खेळण्याची शक्यता देखील आहे. शहा पुढे म्हणाले की, 'आयर्लंड दौरा सोडला तर भारतीय संघात आता फारसे बदल होणार नाहीत. वर्ल्डकपच्या दृष्टीकोणातून मुख्य संघत खेळेल.
जय शहा यांनी सांगितले की, वर्ल्डकपमध्ये खेळणारे वरिष्ठ खेळाडू यात टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या देखील वेस्ट इंडीज विरूद्धच्या तीन वनडे सामन्यात खेळणार आहे. जय शहा म्हणाले, दुसऱ्या क्रिकेट बोर्डाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला सगळीकडे दौरे करावे लागतात. अतिक्रिकेटमुळे दुखापती होत आहेत. आम्हाला दुसऱ्या क्रिकेट बोर्डांचा देखील विचार करावा लागत आहे.'
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी जे वरिष्ठ खेळाडू भारतीय संघाचा भाग नाहीयेत त्यांनी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले पाहिजेत असे वक्तव्य केले. ते म्हणाले, 'चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव सारखे वरिष्ठ खेळाडू हे दुलीप ट्रॉफीत खेळले आहे. जे कोणी एनसीएमध्ये नाहीत आणि भारतीय संघाचा भाग देखील नाहीत त्यांनी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणे गरजचे आहे. 80 टक्के क्रिकेटपटूंनी फिटनेस टेस्ट पास केली आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.