Jay Shah BCCI : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यावर वर्ल्डकप आयोजनादरम्यान झालेल्या ढिसाळ कारभारावरून चांगलीच टीका झाली होती. वर्ल्डकप सामन्यांच्या ठिकणाबद्दल, वेळापत्रकाबद्दल झालेला गोंधळ अन् तिकीट विक्रीची क्लिष्ट केलेली प्रक्रिया यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
मात्र आता जय शहा यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांची सर्वत्र वाहवा होत आहे. भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताच्या धडाकेबाज कामगिरीसोबतच रोहित शर्मा अन् विराट कोहली यांच्यातील बाँडिंग देखील एक चर्चेचा विषय ठरला आहे. दोघे आजी माजी कर्णधार भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी एकदिलाने खेळत आहेत. विराट अन् रोहित यांच्यात वाद असल्याचे वृत्त अनेक दिवसांपासून चघळले जात होते.
मात्र वर्ल्डकपमधील त्यांचे बाँडिंग पाहून क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. रोहित आणि विराटच्या या मनोमिलनामागे जय शहांचा हात असल्याचं बोललं जात आहे. जय शहांनी ही जादू कशी केली हे सर्व क्रिकेट चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील दुरावा कमी झाला आहे. त्यामुळेच वर्ल्डकपमध्ये त्यांचे जबरदस्त बाँडिंग दिसत आहे. जर हे वृत्त खरं असेल तर विराट - रोहितचे हे मनोमिलन भारतीय संघाच्या चांगलंच पथ्यावर पडलं आहे.
भारताने 2015 नंतर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. या दोघांव्यतिरिक्त भारताचा उर्वरित संघ देखील संघभावनेने खेळत आहे. त्यांच्यातील बाँडिंग देखील मैदानाबाहेर उठून दिसतं. ते चांगल्या - वाईट काळात एकमेकांची साथ देत आहेत.
दैनिक जागरणनुसार 2021 मध्ये विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यानंतर रोहित आणि विराटमध्ये सर्वकाही ठीक नव्हतं. अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ड्रेसिंग रूममध्ये दोन गट पडले होते. एक रोहित अन् एक विराट कोहलाचा गट.
मात्र गेल्या वर्षीपासून या दोन खेळाडूंमधील संबंध सुधारले आहेत. सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्टवरून हे सिद्ध देखील होतं.
टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकल्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांना मिठी मारताना दिसले. रोहितने तर विराट कोहलीला खांद्यावरच घेतलं होते. यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये देखील ते एकमेकांचे यश आनंदाने साजरे करताना दिसत आहेत.
विराट रोहितला मैदानावर कायम सल्ला देताना दिसतोय. संघात सामुहिकरित्या निर्णय घेतला जात असल्याचे दिसून येते. जय शहांनी हे खरोखर घडवून आणलं आहे की नाही हे जरी सध्याच्या घडीला माहिती नसलं तरी क्रिकेट चाहते मात्र रोहित - विराटच्या या ब्रोमान्सने सुखावले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.