Team India: आयोजनावर गोंधळ मग BCCI ने घेतला मोठा निर्णय! आता वर्ल्डकप सामने होणाऱ्या 10 स्टेडियमवर...

jay shah
jay shahSAKAL
Updated on

Team India Jay Shah : बीसीसीआयने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्‍या विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणार्‍या 10 राज्य संघटनांना एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यापासून माघार घेण्यास सांगितले आहे. या संदर्भात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गेल्या आठवड्यात क्रिकेट संघटनांना पत्र लिहून या सर्व राज्य क्रिकेट संघटनांना द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेदरम्यान सामन्यांचे आयोजन न करण्याची विनंती केली होती.

jay shah
Team India : रोहित अँड कंपनीला आता श्वास घेणं होणार कठीण? वर्ल्डकप 2023 नंतरही खेळणार ही सीरीज

भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक 10 ठिकाणी खेळवला जाणार आहे. तेथे 2 शहरांमध्ये सराव सामने होतील. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी 27 जून रोजी सर्व क्रिकेट संघटनांना याबाबत विनंती केली होती. ज्यावर सर्व क्रिकेट संघटनांनी सहमती दर्शवली होती. मात्र विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून वाद निर्माण झाला.

jay shah
West Indies WC 2023 : पाकिस्तानच्या हातात किल्ली! वेस्ट इंडिजसाठी वर्ल्ड कपचं उघडणार दरवाजे

विशेषत: मोहाली, इंदूर आणि तिरुअनंतपुरमला विश्वचषकाचे सामने न मिळण्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयानंतर या केंद्रांवर द्विपक्षीय मालिकेदरम्यान एकदिवसीय सामने आयोजित करण्याच्या आशा वाढल्या आहेत.

आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी येणार आहे. अफगाणिस्तानचा संघही भारतात येऊ शकतो. विश्वचषकानंतर लगेचच भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 5 सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे.

यानंतर भारताला बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत भारताला या देशांविरुद्ध मालिका खेळायची आहे. यासाठी रांची, इंदूर, मोहाली, नागपूर या ठिकाणांना होस्टिंगमध्ये प्राधान्य मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()