Ranji Trophy Deepak Dhapola Jay Shah : रणजी ट्रॉफीमधील उत्तराखंड विरूद्ध हिमाचल प्रदेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज दीपक धपोलाने एक मोठा कारनामा करून दाखवला. 32 वर्षाच्या दीपकने हिमाचल प्रदेशचा जवळपास सर्वच संघ एकट्याने बाद केला. दीपकने 8.3 षटकात 35 धावा देत 8 फलंदाज बाद केले. या कामगिरीचे कौतुक खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केल्याने आता त्याच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
उत्तराखंडच्या 32 वर्षाच्या दीपक धपोलाने आपल्या भेद माऱ्याने हिमाचल प्रदेशचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच गुंडाळला. हिमाचलचा संपूर्ण संघ 49 धावातच पॅव्हेलियनमध्ये परतला. हिमाचल प्रदेशचे 5 फलंदाज भोपळाही न फोडता माघारी गेले.
दीपकच्या या कामगिरीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट केले. जय शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा देशातील गुणवत्ता पुढे आली आहे. यावेळी दीपक धपोलाने हिमाचल प्रदेश विरूद्ध 8 षटकात 35 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीतील ही एक उत्तम कामगिरी आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.' (Sports Latest News)
हिमाचल प्रदेशकडून अंकित कालसीने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. उत्तराखंडकडून दीपक धपोलाने 8 तर अभय नेगीने 2 विकेट्स घेतल्या. हिमाचलचा पहिला डाव 16.3 षटकात 49 धावात संपुष्टात आला.
उत्ताराखंडने आपल्या पहिल्या डावात दिवस अखेरपर्यंत 6 बाद 295 धावांपर्यंत मजल मारली होती. उत्तराखंडकडून आदित्य तारेने नाबाद 91 धावा केल्या आहेत. तर अभय नेगी 48 धावा करून नाबाद आहे. उत्तराखंडकडून कर्णधार जीवज्योज सिंहने देखील 45 धावांचे योगदान दिले. हिमाचल प्रदेशकडून कर्णधार ऋषी धवनने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.