Jay Shah Asia Cup 2023 : जय शहा आशिया कपच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानात जाणार, अश्रफ खरं बोलतात की खोटं?

Jay Shah Visit Pakistan
Jay Shah Visit Pakistanesakal
Updated on

India Vs Pakistan Jay Shah : भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकप 2023 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना होणार आहे. त्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला या सामन्याची रंगीत तालीम होईल. यंदाचा आशिया कप हा दोन व्हेन्यूवर होणार आहे. यातील उद्घाटनाच्या सामन्यासह चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे.

एशियन क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष म्हणून जय शहा या उद्घाटनाला उपस्थित राहणार की नाही याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Jay Shah Visit Pakistan)

Jay Shah Visit Pakistan
Team India : टीम इंडियातून बाहेर 'हा' दिग्गज खेळाडू! निवडकर्त्यांच्या एका निर्णयाने संपले करिअर?

पाकिस्तानातील एक्सप्रेस ट्रायबूनला दिलेल्या मुलाखतीत झाका अश्रफ यांनी जय शहा यांना पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं असल्याचे सांगितले. जय शहा यांनी हे आमंत्रण फक्त स्विकारले नसून त्यांनी झाका अश्रफ यांना देखील भारतात येण्याचे आमंत्रण दिलं आहे.

पीसीबी आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी डर्बन येथील आयसीसी बैठकीवेळी भेटले होते. त्यावेळी त्यांनी आशिया कप आणि वर्ल्डकप 2023 बाबतच्या विषयांवर चर्चा देखील केली. (PCB Chairmen Zaka Ashraf)

Jay Shah Visit Pakistan
Ravindra Jadeja : 'तुमचा मुद्दा ठेवा पण संघात...' कपिल देवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजा संतापला

अश्रफ मुलाखतीवेळी म्हणाले, 'जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. ज्यावेळी मी बैठकासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो त्यावेळी मी त्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची विनंती केली होती. आम्ही चर्चा करण्यासाठी बसलो. ही चर्चा सकारात्मक झाली.'

'जय शहा यांनी त्यांचे विचार बोलून दाखवले. मी देखील माझी भुमिका चांगल्या पद्धतीने मांडली. मी त्यांना आशिया कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी येणाचं वचन दिलं आहे. त्यानंतर त्यांनी देखील भारतात होणाऱ्या वर्ल्डकप सामन्यांसाठी मला आमंत्रण दिलं आहे. मी देखील माझ्या उपस्थितीतचं वचन त्यांना दिलं आहे.'

Jay Shah Visit Pakistan
IND Squad For IRE: लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब! एक वर्षानंतर 'या' दिग्गज खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री अन्...

अरूण धुमल यांनी वेगळंच सांगितलं?

अश्रफ यांनी जरी जय शहांनी पाकिस्तानात येणार असल्याचा दावा केला असला तरी बीसीसीआयचे अधिकारी अरूण धुमल यांनी हा दावा फेटाळला आहे. बीसीसीआयचे आयसीसी प्रतिनिधी आणि आयपीएल चेअरमन धुमल यांनी अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

धुमल म्हणाले की, 'अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाहीये तसेच आमचे सचिव देखील पाकिस्तानात जाणार नाहीयेत. फक्त वेळापत्रक निश्चित झालं आहे.'

यावर झाका अश्रफ म्हणाले की, 'हे सर्व जवळपास नक्की झालं होते. मात्र पाकिस्तानी माध्यमात जशी ही बातमी आली, भारतातील पडद्यामागची माणसं हे शक्य नसल्याचे बोलू लागली आहेत. त्यावर आता जय शहा यांनी वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे की त्यांचा असा कोणताही इरादा नाहीये.'

'आम्ही ज्यावेळी ते तयार होतील त्यावेळी दोघांमधील संबंध सुधाऱण्यासाठी काम करण्याचे मान्य केले होते. आम्ही याबाबत हळूहळू पावलं टाकून शेवटी दोघांमधील संबंध सुधारणार आहोत.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.