IND vs SA: जयदेव उनाडकटने टीम इंडियाला दिली घरगुती पार्टी, फोटो व्हायरल

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार शिगेला पोहोचला आहे.
jaydev unadkat gave house party team india after winning south africa
jaydev unadkat gave house party team india after winning south africa
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार शिगेला पोहोचला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया बॅकफूटवर होती, पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली आहे. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 मध्ये भारताने पाहुण्या संघाचा 82 धावांनी पराभव केले. या स्फोटक विजयानंतर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने भारतीय खेळाडूंना डिनर पार्टी दिली. (Jaydev Unadkat House Party Team India After Winning South Africa)

jaydev unadkat gave house party team india after winning south africa
विराटला टक्कर देण्यासाठी संघात आला 'हा' बलाढ्य खेळाडू

उनाडकटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतचे फोटो पोस्ट करत जयदेव उनाडकटने लिहिले, रात्रीच्या जेवणानंतरचे फोटो आहे. हाऊस पार्टी.

राजकोट टी-20 जिंकल्यानंतर टीम इंडिया अंतिम सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मालिकेतील निर्णायक सामना होणार आहे. टीम इंडियाने जर आज पाहुण्या संघाला हरवण्यात यश मिळवले तर तो इतिहास रचणार आहे. आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका कधीच जिंकले नाही. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा भारताचा दौरा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताची ही तिसरी T20I मालिका आहे. 2015/16 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या ३ सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामनापावसामुळे वाया गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.