Jaydev Unadkat : हॅटट्रिकच वादळ! बांगलादेशवरून आला अन् अवघ्या 12 चेंडूत दिल्लीचा धुव्वा उडवला

बांगलादेशातून परत येताच कर्णधाराने केला कहर! पहिल्याच षटकात घेतली हॅटट्रिक
Jaydev Unadkat first-over hat-trick Ranji Trophy 2022-23
Jaydev Unadkat first-over hat-trick Ranji Trophy 2022-23
Updated on

Jaydev Unadkat first-over hat-trick Ranji Trophy 2022-23 : जयदेव उनाडकटने 12 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात संस्मरणीय पुनरागमन करून 2022 ची समाप्ती केली. आता 2023 ची सुरुवातही त्याच्यासाठी संस्मरणीय ठरली आहे. जयदेव उनाडकटने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करताना आपल्या डावाच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेत 2023 ची शानदार सुरुवात केली.

रणजी ट्रॉफीमधील दिल्ली-सौराष्ट्र सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. हा सामना खूपच रोमांचक चालु आहे. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेत दिल्लीच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. हॅट्ट्रिक व्यतिरिक्त जयदेवने वृत्त लिहिपर्यंत आणखी 3 विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे आता त्याच्या खात्यात 6 विकेट जमा झाल्या आहेत. आपल्या झंझावाती गोलंदाजीच्या जोरावर उनाडकने दिल्लीला बॅकफूटवर ढकलले आहे.

Jaydev Unadkat first-over hat-trick Ranji Trophy 2022-23
Team India: भारतीय संघाने पंतसाठी 1 मिनिट 53 सेकंदाचा व्हिडीओ केला शेअर; पांड्या म्हणाला...

जयदेव उनाडकटने आतापर्यंत 9 षटकात 29 धावा देऊन 3.22 च्या इकॉनॉमीसह 6 विकेट घेतले आहेत. उनाडकटने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली. या हॅट्ट्रिकसह उनाडकटने इतिहास रचला आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर उनाडकटने ध्रुव शौरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ध्रुव शौरीला खातेही उघडता आले नाही. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर वैभव रावल (0) उनाडकटचा बळी ठरला.

Jaydev Unadkat first-over hat-trick Ranji Trophy 2022-23
IND vs SL: टीम इंडिया नव्या अवतारात! 10 दिग्गज खेळाडूंना दाखवला घरचा रस्ता...

यानंतर पाचव्या चेंडूवर जयदेव उनाडकटने दिल्लीचा कर्णधार यश धुलला एलबीडब्ल्यू आऊट करून हॅटट्रिक पूर्ण केली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्याच षटकात ही पहिली हॅट्ट्रिक ठरली. सामन्यातील शेवटची पहिली हॅट्ट्रिक कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने केली होती. 2017-18 च्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईविरुद्धच्या पहिल्या आणि तिसऱ्या षटकात त्याची हॅटट्रिक झाली.

जयदेव उनाडकच्या गोलंदाजीची जादू कायम राहिल्यानंतर हॅटट्रिक पूर्ण करून खास विक्रम केला. त्याच्या पुढच्या षटकात त्याने आणखी दोन खेळाडूंची शिकार केली. अशाप्रकारे जयदेव उनाडकने अवघ्या 12 चेंडूत दिल्लीच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस, उनाडकटने आणखी दोन विकेट्स जोडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याची 21 वी पाच बळी पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.