Team India : वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या खेळाडूने उचललं मोठं पाऊल! 'या' टीमसोबत खेळण्याची केली घोषणा

Jaydev Unadkat
Jaydev Unadkat
Updated on

Jaydev Unadkat to play for Sussex : भारतीय खेळाडूंबाबत अनेकदा अश्या बातम्या आल्या आहेत की, जेव्हा ते संघाबाहेर असतात किंवा फॉर्ममध्ये नसतात तेव्हा ते काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आधी चेतेश्वर पुजारा ससेक्स संघाचा महत्त्वाचा भाग बनला. त्याचवेळी आता पृथ्वी शॉने देशांतर्गत वनडे चषकात एंट्री मारली.

आता आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा एक खेळाडू कौंटीकडे वळला आहे. विशेष बाब म्हणजे काउंटी कसोटी सप्टेंबरमध्ये 3 ते 22 या कालावधीत होणार आहेत. म्हणजेच या खेळाडूचे आशिया कपमधून बाहेर पडणेही निश्चित आहे.

Jaydev Unadkat
IND vs IRE T20 : बुमराहची फिटनेस टेस्ट! पुढच्या पिढीचे शिलेदार ऋतुराज-रिंकूकडे मोठी संधी तर संजूच काय?

10 वर्षांनंतर जयदेव उनाडकट ब्लू जर्सीमध्ये परतला. पण आता आशिया कपपूर्वी त्याने मोठा निर्णय घेतला आणि ससेक्स संघात सामील झाला आहे. त्याच्या आधी त्याचाच सौराष्ट्र संघातील सहकारी चेतेश्वर पुजारा या संघाशी जोडला गेला होता.

पुजाराने नुकतेच देशांतर्गत एकदिवसीय चषकातही ससेक्ससाठी शानदार खेळी खेळली. उनाडकट आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कौंटी चॅम्पियनशिपच्या विभाग 2 मध्ये पहिले तीन सामने खेळणार आहे. काउंटी क्लबने ट्विटरवर ही माहिती दिली.

Jaydev Unadkat
IRE vs IND 1st T20: आजपासून रंगणार आयर्लंड विरुद्धचा टी-20 थरार! स्टार अन् सोनीवर नाही तर येथे पाहा 'फ्री' सामना

ससेक्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर प्रेस रिलीज शेअर केले आणि म्हटले की, जयदेव उनाडकट संघात सामील झाला आहे. तो डरहॅम, लीसेस्टरशायर आणि डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यांसाठी निवडीसाठी उपलब्ध असेल. पुजाराने गेल्या हंगामात ससेक्सचे कर्णधारपद भूषवले होते. उनाडकट प्रथमच कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()