अभिमानास्पद! मुंबईकर जेहाननं रचला इतिहास; F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय

जेहानचा प्रतिस्पर्धी असलेला युकी शुनोडा दुसऱ्या स्थानी राहिला. तो ३.५ सेकंद जेहानच्या मागे होता. तसेच टिकटुमला तिसरा क्रमांक मिळाला.
Jehan Daruwala
Jehan DaruwalaTwitter
Updated on
Summary

जेहानचा प्रतिस्पर्धी असलेला युकी शुनोडा दुसऱ्या स्थानी राहिला. तो ३.५ सेकंद जेहानच्या मागे होता. तसेच टिकटुमला तिसरा क्रमांक मिळाला.

मनामा : बहारीनमधील साखिर ग्रँड प्रिक्स येथे फॉर्मुला-टू शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत भारतीय चालक जेहान दारुवालाने इतिहास रचला. फॉर्मुला-टू शर्यत जिंकणारा जेहान हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रविवारी झालेल्या या शर्यतीत जेहानने रेयो रेसिंग प्रकारात भाग घेतला होता. या शर्यतीत जपानचा युकी सुनोडा हा त्याचा प्रतिस्पर्धी होता. शर्यत अत्यंत रंजक बनली होती. जेहान ग्रीडच्या दुसऱ्या बाजूने शर्यत सुरू केली. काही वेळातच त्याने डॅनियल टिकटुमची बरोबरी केली. पण टिकटुमने पुन्हा सरशी साधली. पण जेहानने हार मानली नाही. आणि सर्वांना पाठीमागे टाकत रोमाचंक विजय साजरा केला. (Jehan Daruwala became first Indian to win formula two race in Azerbaijan Grand Prix)

विजयानंतर ट्विट करुन व्यक्त केला आनंद

फॉर्म्युला टू शर्यत जिंकलेल्या जेहान दारूवालाने आनंद व्यक्त करत ट्विट केले की, "विजयाने या मोसमाचा शेवट झाला. माझ्या बाजूने उभे राहिलेल्या माझ्या टीमचे मी आभार मानतो. ज्यांनी माझ्या विजयासाठी प्रार्थना केली त्यांचेही आभार." यासह पुढच्या मोसमातही शर्यतीत सहभाग घेणार असल्याचे संकेत जेहानने दिले.

युकी शुनोडा दुसऱ्या स्थानी

दरम्यान, जेहानचा प्रतिस्पर्धी असलेला युकी शुनोडा दुसऱ्या स्थानी राहिला. तो ३.५ सेकंद जेहानच्या मागे होता. तसेच टिकटुमला तिसरा क्रमांक मिळाला. विजयानंतर जेहान म्हणाला की, मी माझ्या भारतीय देशबांधवांना सांगू इच्छितो की, आपल्याकडे युरोपमधील ड्रायव्हर्ससारख्या चांगल्या सुविधा नसतील, पण आपण कठोर परिश्रम घेतले, तर विजय तुमचाच आहे.''

केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनीही जेहानचं अभिनंदन केलं आहे. ''जेहान एफ-१ रेसमध्ये प्रवेश करण्याची आमची आशा आहे. अझरबैजान ग्रँड प्रिक्स एफआयए फॉर्म्युला-२ चॅम्पियनशिपचे दुसरे स्थान मिळविल्याबद्दल भारताला अभिमान वाटला आहे. तसेच ग्रँड प्रिक्स जिंकणारा जेहान एकमेव भारतीय आहे,'' असं रिजिजू यांनी म्हटलं आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.