Jhulan Goswami : झुलन म्हणाली; निवृत्त होताना एकच शल्य कामय मनात राहील...

Jhulan Goswami Says Not winning an ODI World Cup Is only regret
Jhulan Goswami Says Not winning an ODI World Cup Is only regretesakal
Updated on

Jhulan Goswami London : भारताची स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. दरम्यान, भारताकडून 353 विकेट घेतलेल्या झुलन गोस्वामीने आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दित एकाच गोष्टची शल्य मनात राहिलं असल्याचे सांगितले. झुलन गोस्वामी 25 सप्टेंबरला आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. ती इंग्लंडविरूद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या शेवटच्या वनडे सामन्यानंतर निवृत्त होणार आहे.

Jhulan Goswami Says Not winning an ODI World Cup Is only regret
IND VS AUS 2nd T20 : सामना रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का?

दरम्यान, झुनल गोस्वामीने मुलाखतीवेळी सांगितले की तिच्या मनात एकही वनडे वर्ल्डकप जिंकू शकलो नाही ताचे शल्य कायम राहणार आहे. भारत 2005 आणि 2017 ला वनडे वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत पोहचला होता. मात्र भारताला फायनल जिंकता आली नव्हती. या दोन्ही अंतिम सामन्यात झुलन गोस्वामी खेळली होती.

झुलन गोवस्वामी म्हणाली की, 'मी दोन वर्ल्डकप फायनल सामने खेळले आहेत. यातील एक जरी फायनल आम्ही जिंकली असती तर ते माझ्यासाठी आणि संघासाठी देखील छान झालं असतं. प्रत्येक खेळाडू त्या एका स्वप्नासाठी खेळत असतो. आम्ही 2 ते 3 फायनल खेळल्या आहेत. मात्र त्यातील एकही फायनल जिंकण्यात आम्हाला यश आले नाही. याच शल्य माझ्या मनात कायम राहील.'

Jhulan Goswami Says Not winning an ODI World Cup Is only regret
IPL 2023 Auction :डिसेंबरमध्ये ठरणार जडेजा CSK की GT चा; BCCI लिलावाचं करतंय प्लॅनिंग?

गोस्वामी पुढे म्हणाली की, 'तुम्ही वर्ल्डकपची चार वर्षे तयारी करत असता. त्यामागे खूप कष्ट असतात. प्रत्येक खेळाडूसाठी वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्नवत असतं. मात्र मी ज्या नजरेतून पाहत आहे भारतीय महिला क्रिकेटचा ग्राफ हा उंचच जाणार आहे. ज्यावेळी मी खेळण्यास सुरूवात केली त्यावेळी इतकी दीर्घ कारकिर्द असेल असा मी विचारच केला नव्हता. हा खूप भारी अनुभव आहे. मी क्रिकेट खेळू शकले याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.