Jhulan Goswami Retirement : झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मिताली राजनंतर आता भारताच्या दुसऱ्या सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या बाबातचे वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी नुकताच भारतीय महिला संघ घोषित झाला. या संघात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा देखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे झुलनला महिला वनडे वर्ल्डकपनंतर विश्रांती देण्यात आली होती. ती वर्ल्डकपमधील श्रीलंकेविरूद्धचा सामना देखील खेळली नव्हती. दरम्यान, आता ती इंग्लंड दौऱ्यावर 24 सप्टेंबरला लॉर्ड्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्ता एनडीटीव्हीने दिले आहे.
झुलन गोस्वामी महिला क्रिकेटमध्ये सर्व क्रिकेट फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तिच्या नावावर सध्या 352 विकेट्स आहेत. यापूर्वी झुलन गोस्वामीची दीर्घ काळापासून संघ सहकारी असेलेल्या मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान, बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी केली.
इंग्लंड विरूद्धची तीन टी 20 सामन्यांची मालिका 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. तर तीन वनडे सामन्यांची मालिका 18 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या संघात मराठमोळ्या किरण नवगिरे हिचा देखील समावेश करण्यात आला आहे. ती टी 20 संघामधून भारताचे प्रतिनिधित्व करेल. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. त्यानंतर संघाचा हा पहिलाच दौरा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.