Joe Root ENG vs PAK : @1000! जो रूटनं वनडे वर्ल्डकपच्या 48 वर्षाच्या इतिहासात जे झालं नाही ते करून दाखवलं

Joe Root World Cup 2023
Joe Root World Cup 2023 esakal
Updated on

Joe Root World Cup 2023 : इंग्लंडच्या संघाला सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर गेल्यानंतर सूर गवसला आहे. त्यांनी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत दमदार सुरूवात केली.

डेव्हिड मलान (31) अन् जॉनी बेअरस्टो (59) यांनी दमदार सुरूवात करून दिल्यानंतर इंग्लंडचा डाव जो रूट आणि बेन स्टोक्सने पुढे नेला. या दोघांनी संघाचे द्विशतक पार करून दिले. दरम्यान, जो रूटने आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Joe Root World Cup 2023
World Cup 2023 : विराट कोहलीनं 'फुटेज' खाल्लं... रोहितच्या चाहत्यांनी सोशलवर सुरू केला ट्रेंड

जो रूटने इंग्लंडकडून वर्ल्डकपमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे वनडे वर्ल्डकपच्या 48 वर्षाच्या इतिहासात इंग्लंडच्या एखाद्या फलंदाजाने 1000 धावा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या उरल्या सुरल्या आशा देखील संपुष्टात आल्या.

Joe Root World Cup 2023
ODI World Cup : कधी नव्हे तर या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच घडलं! स्टेडियममध्ये जाऊन इतक्या लोकांनी पाहिला सामना

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने दमदार सुरूवात केली. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी 14 षटकात 82 धावांची सलामी दिली. यानंतर मलान 31 धावा करून बाद झाला. दरम्यान बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्याने रूटसोबत संघाचे शतक धावफलकावर लावले.

मात्र हारिस राऊफने त्याला 59 धावांवर बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरत जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी 132 धावांची शतकी भागीदारी रचली. स्टोक्सने 76 चेंडूत 84 धावा चोपल्या. यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. अखेर शाहीन अफ्रिदीने ही जोडी फोडली. त्याने स्टोक्सचा त्रिफळा उडवला.

स्टोक्स बाद झाल्यानंतर रूट देखील 72 चेंडूत 60 धावा करत बाद झाला. शेवटची 10 षटके राहिली असताना दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाल्याने इंग्लंडची धावगती थोडी मंदावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.