IND vs ENG Joe Root : अक्षरला चौकार मारत रूटने मोडला सचिनचा विक्रम मात्र जडेजाने...

Root broke Sachin's record by hitting Akshar for four: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये आता जो रूटचा दबदबा...
IND vs ENG Joe Root
IND vs ENG Joe Root esakal
Updated on

Joe Root Test Record Sachin Tendulkar : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडची अवस्था बिकट झाली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ दुसरे सत्र सुरू होताच माघारी परतला.

इंग्लंडचा सर्वात भरवशाचा फलंदाज जो रूटने जॉनी बेअरस्टोसोबत चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर आणि जडेजाने दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, जो रूटने आपल्या 29 धावांच्या खेळीत एक विक्रम देखील केला.

IND vs ENG Joe Root
IND vs ENG 1st Test Day 1 : यशस्वी जयस्वालची फटकेबाजी; पहिल्या दिवसावर भारताची छाप

इंग्लंडच्या माजी कर्णधार जो रूटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मागे टाकला. जो रूटने आपल्या इंनिंगमधील 10 रन घेत हा कारनामा केला. सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याने 2535 धावा केल्या होत्या. आता जो रूटने हा विक्रम मागे टाकला.

आता कसोटीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर झाला आहे. जो रूटने अक्षर पटेलला चौकार मारत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

IND vs ENG Joe Root
Ind vs Eng : BCCI ने आवेश खानला टीम इंडियातून अचानक का काढले बाहेर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच भारतीय फिरकीपटूंनी दमदार गोलंदाजी करत पाहुण्या इंग्लंडला चांगलाचे दमवले. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी पहिल्या 10 षटकात जवळपास 5 च्या सरासरीने धावा केल्या. मात्र भारतीय फिरकीपटूंनी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर चित्र पालटले.

अश्विनने बेन डकेटला 35 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला ओली पोप हा रविंद्र जडेजाची शिकार झाला. पोप 1 धावेवर बाद झाल्यानंंतर अश्विनने पुन्हा एकदा सेट फलंदाजाची शिकार केली. त्याने झॅक क्राऊलीला 20 धावांवर बाद केले.

इंग्लंडची अवस्था 3 बाद 60 धावा अशी झाल्यानंतर अनुभवी जॉनी बेअरस्टो आणि जो रूटने चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. या जोडीची भागीदारी 60 धावांच्या पार गेल्यानंतर अक्षर पटेलने कमाल केली. 35 धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवत इंग्लंडला चौथा धक्का दिला. पाठोपाठ रविंद्र जडेजाने देखील रूटला 29 धावांवर बाद केले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.