Jofra Archer : मुंबई इंडियन्सची तोफ धडाडण्यास झाली सज्ज; जाणून घ्या कधी करणार कमबॅक?

Jofra Archer Comeback
Jofra Archer Comeback ाेोकोत
Updated on

Jofra Archer Comeback : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गेल्या वर्षभरापासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मात्र आता हा इंग्लंडचा तेज तर्रार गोलंदाज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. या वेगवान गोलंदाजाचे नाव आहे जोफ्रा आर्चर. हा तोच जोफ्रा आर्चर आहे ज्याला मुंबई इंडियन्सने तो दुखापतग्रस्त असल्याचे माहिती असून देखील आपल्या संघात घेतले होते. 2022 मध्ये झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात जोफ्रा आर्चरवर मुंबईने तब्बल 8 कोटींचा दाव खेळला होता.

Jofra Archer Comeback
IPL Auction Live Streaming: आयपीएल 2023 साठी लिलाव कधी अन् कुठे पाहायचा?

मुंबई इंडियन्सने तब्बल 8 कोटी खर्चून मेगा लिलावत जोफ्रा आर्चरला आपल्या संघात घेतले खरे मात्र तो 2022 च्या आयपीएल हंगामात दुखापतीमुळे मुंबईकडून एकही सामना खेळू शकला नाही. इतकेच काय तर दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोफ्रा आर्चरला ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपला देखील मुकावे लागले होते. आता हाच जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंड संघात जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला आहे.

जोफ्रा आर्चर बाबत बोलताना इंग्लंड क्रिकेट बोर्ड म्हणानले की, 'जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीतून चांगल्या पद्धतीने सावरला आहे. तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल.'

Jofra Archer Comeback
BAN vs IND : उमेश यादव म्हणजे आशियातला वाघ! बांगलादेशला पहिल्याच दिवशी गुंडाळले

इंग्लंडचा वनडे संघ

जॉस बटलर, मोईन अली, जोफ्रा आर्चर, हॅरी ब्रुक्स, सॅम करन, बेन डकेट, डेव्हिड मलान, आदिल राशीद, जसन रॉय, फिल साल्ट, ऑली स्टोन, रिसे टॉप्ले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.

दक्षिण आफ्रिकेचा वनडे दौरा

27 जानेवारी पहिली वनडे

29 जानेवारी दुसरी वनडे

1 फेब्रुवारी तिसरी वनडे

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.