John Cena Retires : चाहत्यांना मोठा धक्का! WWE स्टार जॉन सीनाने घेतली निवृत्ती; ट्रिपल एचने शेअर केला 'तो' व्हिडिओ

John Cena Announces Retirement : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा स्टार जॉन सीना लवकरच आपल्या दिग्गज कारकिर्दीचा अंत करणार आहे.
John Cena Retires
John Cena Retires
Updated on

John Cena Retires : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चा स्टार जॉन सीना लवकरच आपल्या दिग्गज कारकिर्दीचा अंत करणार आहे. जॉन सीनाने WWE च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये इन-रिंग स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो 2025 मध्ये WWE ला निरोप देईल.

John Cena Retires
ICC Champions Trophy Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तानला देणार धक्का?

जॉन सीना टोरंटो कॅनडात 'WWE मनी इन द बँक' शोमध्ये परतला. त्याने अचानक एन्ट्री करून सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर तो म्हणाला, 'आज रात्री मी WWE मधून माझ्या निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे.' जॉन सीनच्या या घोषणेने त्याचे चाहते दु:खी झाले आहेत. एका सोशल मीडिया यूजरने 'विल मिस यू चॅम्पियन' अशी कमेंट केली आहे.

सीनाने खुलासा केला की, तो सध्या 'मंडे नाईट रॉ' वर राहण्याची योजना आखत आहे. खरंतर, 'मंडे नाईट रॉ' हा शो जानेवारी 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे.

John Cena Retires
Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

सीना म्हणाला- 2025 रॉयल रंबल माझे शेवटचे असेल. 2025 एलिमिनेशन चेंबर माझे शेवटचे असेल. आणि लास वेगासमधील रेसलमेनिया 2025 ही मी स्पर्धा केलेली शेवटची रेसलमेनिया असेल हे जाहीर करण्यासाठी मी आज रात्री येथे आहे.

जॉन केवळ एक रेसलर नाही तर एक अभिनेता, रॅपर आणि टेलिव्हिजन दिग्गज व्यक्तिमत्व आहे, VIP टोटल ॲसेट्सच्या रिपोर्टनुसार, जॉन सीनाची 2024 मध्ये 80 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.