Jonny Bairstow Rishi Sunak : बेअरस्टोच्या 'रन आऊट' वादात आता थेट पंतप्रधानांची उडी; ऋषी सुनक म्हणतात...

Jonny Bairstow Rishi Sunak
Jonny Bairstow Rishi Sunak esakal
Updated on

Jonny Bairstow Rishi Sunak : अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या रन आऊटने क्रिकेट जगतात वाद निर्माण झाला आहे. बेअरस्टोला ज्या प्रकारे एलेक्स कॅरीने रन आऊट केले ते पाहून ब्रिटीश जनता जाम खवळली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने नियमाचा आधार घेत आपली चाल कशी वैध होती हे सांगत आहेत.

मात्र आता इंग्लंड - ऑस्ट्रेलियामधील खेळ भावनेच्या वादात इंग्लंडचे पंत प्रधान ऋषी सुनक यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या संघाच्या कर्णधाराची बाजू उचलून धरत अप्रत्यक्षरित्या ऑस्ट्रेलियाची भुमिका चुकीची ठरवली आहे.

Jonny Bairstow Rishi Sunak
Ashes Series 2023 : खेळ भावना गेली उडत? पॅट कमिन्सच्या पत्रकार परिषदेचा VIDEO व्हायरल

ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने बेअरस्टोच्या वादग्रस्त रन आऊट बाबत पंतप्रधानांना काय वाटतं हे सांगितले. ते म्हणाले की, 'पंतप्रधान हे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या मताशी सहमत आहे. बेन स्टोक्स म्हणाला होता की, तो सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जे केले तसं करणार नाही.'

याचबरोबर सुनक यांच्या प्रवक्त्याने एमसीसी लाँग रूममध्ये उस्मान ख्वाजाबाबत जे काही झालं ते योग्य नसल्याचे पंतप्रधानांना वाटते असेही सांगितले.

Jonny Bairstow Rishi Sunak
Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगमासाठी 'या' दिवशी होणार लिलाव

प्रवक्ता म्हणाला की, 'पंतप्रधानांना वाटते की एमसीसीने खराब वर्तनुकी प्रकरणी सदस्यांचे निलंबन करून योग्य कारवाई केली आहे.' ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयन लंगडत लंगडत खेळण्यासाठी आला त्यावेळी एमसीसी सदस्यांनी त्याला स्टँडिंग ओवेशन दिले होते. हे खेळ भावनेचे उत्तम उदाहरण होते असं सुनक यांना वाटते.

मात्र सुनक यांनी याबाबत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथोनी अल्बानेसे यांच्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. यापूर्वी इंग्लंडने 1932 - 33 च्या अ‍ॅशेस स्पर्धेत बॉडीलाईन टॅक्टिस वापरली होती त्यावेळी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध ताणले गेले होते.

(Sports News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.