Deepthi Jeevanji: दिव्यांगत्वासह जन्मलेल्या दीप्ती जीवनजीने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. दीप्ती ने जगाला दाखवून दिले आहे की इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते. दीप्तीचा हा प्रवास आव्हानांनी भरलेला व प्रेरणादायी आहे. मेंटल मंकी नावाने तिला गावकऱ्यांनी ऐकेकाळी हिणवले होते. अशा अनेक आव्हानांना न जुमानता पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दीप्तीने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. दीप्तीने पॅरिसमध्ये भारतासाठी महिलांच्या ४०० मीटर टी-२० शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. ही शर्यत दीप्तीने ५५.८२ सेकंदात पूर्ण केली.
दीप्ती जीवनजीने यापूर्वी जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स पॅरा चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. तिने या ,स्पर्धेत ब्रेना क्लार्कचा ५५.१२ सेकंदांचा विक्रम मोडला होता.
दीप्ती मूळची आंध्र प्रदेश, वारंगल जिल्ह्यातील कलेदा गावातील आहे. ती जन्मतःच दिव्यांग होती व तिचे ओठ आणि नाक थोडेसे असामान्य होते. तिला पाहणारा प्रत्येक गावकरी आणि तिचे काही नातेवाईक दीप्तीला मंद माकड म्हणायचे आणि तिला अनाथाश्रमात पाठवायला सांगायचे. आज तिला परदेशात वर्ल्ड चॅम्पियन बनताना पाहून ती खरोखरच एक कौशल्यवान मुलगी आहे हे सिद्ध झाले आहे.
दीप्तीला आर्थिक सहकार्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांनी आठ वर्षांपूर्वी वारंगलमधील कल्लेडा येथील अर्धा एकर जमीन विकली होती. जी की दीप्तीने आपल्या कमाईमधून परत विकत घेतली आहे. आपल्या मुलीच्या मोठ्या पराक्रमानंतर दीप्तीचे आई-वडील भावुक झाले आहेत. नातेवाईकांकडून ऐकायला मिळणाऱ्या टोमण्यांचे उत्तर दीप्तीने आपल्या कामगिरीतून दिले आहे.
दीप्ती शाळेत असताना तिच्या इयत्ता नववी मधील शारिरीक शिक्षणच्या शिक्षिकेने खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. तिला पुलेला गोपीचंद यांचाही पाठिंबा मिळाला, त्यांनी तिची हैदराबाद येथील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरण राष्ट्रीय संस्थेत चाचणी घेण्याचे सुचवले. संबंधित चाचण्यांनंतर तिला मानसिकदृष्ट्या दुर्बल श्रेणी अंतर्गत प्रमाणित करण्यात आले आणि त्यामुळे तिला पॅरा ॲथलीट म्हणून भाग घेण्याची परवानगी मिळाली. नंतर तीने भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक रमेश यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि आपल्या पॅरा ॲथलीट कारर्किदीची सुरूवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.