भारताची सुवर्ण संधी हुकली; पदकाची आस कायम!

भारताची सुवर्ण संधी हुकली; पदकाची आस कायम!
Updated on
Summary

ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं आहे.

भुवनेश्वर - एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप २०२१ (junior hockey world cup) दुसऱ्यांदा जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं आहे. जर्मनीने (Germany) भारताचा (India) ४-२ असा पराभव केला. सहावेळा चॅम्पियन असलेल्या जर्मनीची अंतिम फेरीत अर्जेंटिनाशी (Argentina) गाठ पडणार आहे. तर भारत तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्सविरुद्ध (France) खेळणार आहे. भारताची सुवर्णसंधी जरी हुकली असली तरी कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. फ्रान्सविरुद्ध विजय मिळवल्यास भारताला कांस्यपदक मिळेल. भारताने याआधी फ्रान्सला ४.-५ ने पराभूत केलं होतं.

लखनऊमध्ये २०१६ मध्ये ज्युनिअर वर्ल्ड कप जिंकलेल्या भारताला यावेळी जर्मनीविरुद्ध मात्र फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे जर्मनीविरुद्ध भारतावर दबाव निर्माण झाला. जर्मनीकडून एरिक क्लेनलेन, एरोन फ्लॅटन, कर्णधार हेन्स मुलर, ख्रिस्तोफर कुटर यांनी गोल केले. तर भारताकडून उत्तम सिंह आणि बॉबी सिंह धामी यांनी गोल केले.

भारतीय संघाने क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियमविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. बचाव फळीत जबरदस्त कामगिरी करत बेल्जियमला नमवलं, मात्र जर्मनीविरुद्ध बचावात भारत कमी पडला. मधल्या आणि आघाडीच्या फळीत समन्वयाचा अभाव दिसत होता. तर जर्मनीने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.