Justin Langer
Justin Langeresakal

ऑस्ट्रेलियन संघाचा राजीनामा देणारे 'जस्टिन' इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक होणार!

Published on
Summary

जस्टिन लँगर यांनी 4 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.

लंडन : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून (Australia cricket Team) दोन महिन्यांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणारे जस्टिन लँगर (Justin Langer) पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, यावेळी लँगर कांगारू संघाचा प्रशिक्षक असणार नाहीयत. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, लँगर इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदी ख्रिस सिल्व्हरवुडच्या (Chris Silverwood) जागी नियुक्त होऊ शकतो. सिल्व्हरवुडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर पदावरून हटवण्यात आलं होतं. अॅशेस मालिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर संघाची पुनर्बांधणी करण्याची चर्चाही सुरु होती. दरम्यान, पॉल कॉलिंगवूड (Paul Collingwood) यांची वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यात इंग्लंड क्रिकेट संघाचे (England Cricket Team) अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

जस्टिन लँगर यांनी गेल्या महिन्यात 4 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वी लँगरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका (Ashes Series) जिंकल्यानंतर आणि कांगारू संघानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांना काही काळासाठी कार्यकाळात मुदतवाढीची ऑफरही देण्यात आली होती. मात्र, ती ऑफर लँगरनं नाकारली. तर, दुसरीकडं इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (England Cricket Board, ECB) देखील नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, ईसीबीला एप्रिलच्या मध्यापर्यंत मुख्य प्रशिक्षक पद भरायचं आहे, असं कळतंय.

Justin Langer
GT VS LSG : 'जॉनी दुश्मनी'चा द एन्ड; कॅचमुळं दिसली क्रुणाल-हुड्डातील मैत्री

इंग्लंडचा प्रशिक्षक होण्यास लँगर तयार?

द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, लँगर इंग्लंड संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. दरम्यान, इंग्लंडच्या एकदिवसीय आणि कसोटी संघांचं वेळापत्रक पाहता वेगळे प्रशिक्षक असावेत, असं लँगर यांना वाटत असल्याचंही कळतंय. त्यामुळं इंग्लंड बोर्ड त्यांच्या नेतृत्वाचा विचार करु शकतं. तर, पॉल कॉलिंगवूडही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. या वर्षी इंग्लंड जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()