Jyoti Yaraji: आता अपेक्षा ज्योती यराजी हिच्याकडून; जागतिक ॲथलेटिक्स - प्राथमिक फेरीतच कडवे आव्हान असणार

चीनमधील स्पर्धेत तिने १२.७८ सेकंद अशी विक्रमी वेळ दिली.
Jyoti Yaraji
Jyoti YarajiSakal
Updated on

बुडापेस्ट - जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारतीयांचे आशास्थान असलेल्या खेळाडूंपैकी एक ज्योती यराजी आपल्या आवडत्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत उद्या, मंगळवारी प्राथमिक फेरीत सहभागी होत आहे. अविनाश साबळे, तिहेरी उडीतील प्रवीण चित्रावेल, अब्दुला अबुबकर यांनी निराशा केल्यानंतर ज्योतीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.

गेल्या महिन्यात आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने चीनमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. चीनमधील स्पर्धेत तिने १२.७८ सेकंद अशी विक्रमी वेळ दिली. यंदा तिच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय पदके, १२.७८ सेकंद अशी वेळ असली, तरी उद्या प्राथमिक फेरीतच तिच्यापुढे तगडे आव्हान आहे.

Jyoti Yaraji
Mumbai News : सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या श्वानांच्या मालकांवर होणार कारवाई; पालिका आकारणार दंड

१०० मीटर हर्डल्स शर्यतीत ४० खेळाडूंची पाच हीटमध्ये विभागणी करण्यात आली असून ज्योतीचा चौथ्या हिटमध्ये समावेश आहे. प्रत्येक हिटमधील प्रथम चार आणि उर्वरित खेळाडूंमधून चार सर्वोत्कृष्ट वेळेची नोंद करणारे खेळाडू उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेती व गत स्पर्धेतील ब्राँझपदक विजेती प्युर्टो रिकोची जस्मिन कमाचो क्वीन ही ज्योतीच्याच हिटमध्ये आहे. जस्मिनची यंदाची सर्वोत्तम वेळ १२.३१ सेकंद अशी आहे.

Jyoti Yaraji
Mumbai News : मुंबईकरांना वेळ दाखविणाऱ्या २६ हेरिटेज घड्याळ !

याशिवाय स्वित्झर्लंडची युरोपियन ब्राँझपदक विजेती २१ वर्षीय दिताजी कम्बुदजी, टोकियोत पाचवे स्थान मिळवणारी नेदरलँडची नदिन व्हिसेर आणि फ्रान्सची इनडोअर राष्ट्रीय विजेती लिशिया बाप्टे या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.दिताजीची यंदाची सर्वोत्तम वेळ १२.४७, नदिनची १२.६५; तर लिशियाची १२.६९ सेकंद अशी आहे.

यावरून ज्योतीपुढे किती कडवे आव्हान आहे हे स्पष्ट होते. ज्योतीने १२.७८ सेकंद या आपल्या सर्वोत्तम वेळेपेक्षा सरस कामगिरी केली तर ती पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरेल. कारण पॅरिससाठी १२.७७ सेकंद अशी पात्रता आहे. याशिवाय क्रिशन कुमार ८०० मीटरच्या प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.