Kane Williamson : न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! IPL मुळे केन विल्यमसन ODI वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळली जाणार आहे पण त्याआधी...
Kane Williamson
Kane Williamson
Updated on

Kane Williamson ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळली जाणार आहे. ही मोठी स्पर्धा लक्षात घेऊन सर्व संघ आयपीएलमध्ये खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत.

आयपीएल 2023 मध्ये फक्त तीन सामने खेळले गेले आहेत, परंतु त्याच दरम्यान एक वाईट बातमी समोर येत आहे. सीझन 16च्या पहिल्या सामन्यादरम्यान एक धडाकेबाज खेळाडू जखमी झाला होता. या खेळाडूला आता एकदिवसीय विश्वचषक 2023 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे.

Kane Williamson
IPL 2023 : शेवटच्या चेंडूवर गंभीरने खेळला मोठा खेळ...! विकेट पडल्यानंतर लखनौला मिळाले 6 धावा

गुजरात टायटन्ससाठी आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात गुडघ्याला दुखापत झालेल्या केन विल्यमसनच्या विश्वचषकासाठी न्यूझीलंडमध्ये त्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना केन विल्यमसनला दुखापत झाली होती.

केन विल्यमसन या दुखापतीमुळे आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधूनही बाहेर जाण्याचा धोका आहे.

Kane Williamson
Salim Durani Death : युवराज अन् धोनीच्या आधीचा 'सिक्सर किंग'; ऑन डिमांड मारायचा षटकार

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या डावादरम्यान विल्यमसनला सीमारेषेवर एक चौकार रोखण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. तो वेदनेने ओरडत होता. नंतर फिजिओ आले काही वेळाने खांद्याचा आधार घेऊन त्याला मैदानाबाहेर काढले. त्याचवेळी त्याच्या जागी साई सुदर्शनला इम्पॅक्ट प्लेयर खेळाडू म्हणून घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.