तिसऱ्या टी-20 सामन्याआधी संघाला मोठा धक्का! मालिकेच्या मध्येच कर्णधार बाहेर, मोठे कारण आले समोर

Kane Williamson ruled out T20I matches against Pakistan News :
Kane Williamson ruled out T20I matches against Pakistan News
Kane Williamson ruled out T20I matches against Pakistan Newssakal
Updated on

New Zealand vs Pakistan T20 : न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. न्यूझीलंडने पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा 46 धावांनी तर दुसऱ्या टी-20 सामन्यात 21 धावांनी पराभव केला. यामुळे पाकिस्तानी संघ मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे.

दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना 17 जानेवारीला होणार आहे. मात्र आता न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे, त्यांचा कर्णधार मालिकेतून बाहेर पडला आहे.

Kane Williamson ruled out T20I matches against Pakistan News
Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट! केंद्रीय सरकारने घेतली मोठी ॲक्शन

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला आणि त्याला दुखापत झाली. तो मैदानाबाहेर गेला आणि परत आलाच नाही. यानंतर टीम साऊदीने दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर विल्यमसनवर स्कॅन केले गेले, ज्याने हॅमस्ट्रिंगच्या किरकोळ दूखापत पुष्टी झाली. या कारणामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित तीन टी-२० सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

केन विल्यमसनचा जागा आता विल यंग घेईल. विल यंगने न्यूझीलंड संघासाठी 14 टी-20 सामन्यांमध्ये 260 धावा केल्या आहेत, परंतु विल्यमसनची बाहेर पडणे न्यूझीलंडसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. त्याने न्यूझीलंड संघासाठी एकट्याने अनेक सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.