Kane Williamson : सलग चौथ्या कसोटीत शतकी खेळी! फॅब 4 मध्ये केन विलियमसनने विराट कोहलीशी केली बरोबरी

Kane Williamson
Kane Williamsonesakal
Updated on

Kane Williamson : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने झुंजार शतकी खेळी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. त्याने 205 चेंडूत 104 धावा ठोकल्या. या खेळीमुळे न्यूझीलंड बांगलादेशच्या पहिल्या डावातील 310 धावांच्या जवळ पोहचण्यात यशस्वी झाली.

केन विलियमसनने या शतकाबरोबरच काही माईल स्टोन देखील पार केले आहेत. केन विलियमसनने सलग चौथ्या कसोटीत शंभरपेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेटमधील विलियमसनचे 29 वे शतक होते. जागतिक क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ, जो रूट, विराट कोहली आणि केन विलियमसन या फॅब 4 मध्ये शतकांची स्पर्धा सुरू आहे.

Kane Williamson
खतरनाक...! 'या' खेळाडूने क्रिकेट विश्वात उडवून दिली खळबळ, एकही धाव न देता घेतल्या ८ विकेट

या स्पर्धेत केन विलियमसनने कसोटी शतकांच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. या फॅब 4 मध्ये सध्या स्टीव्ह स्मिथ हा 102 कसोटी सामन्यात 32 शतके ठोकत आघाडीवर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 135 कसोटीत 30 शतके ठोकणारा जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. 95 कसोटीत 29 शतके ठोकणारा केन विलियमस आणि 111 कसोटीत 29 शतके ठोकणारा विराट कोहली संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत.

केन विलियमसनने कसोटीत आतापर्यंत 10 देशांमध्ये शतकी खेळी केली आहेत. यात न्यूझीलंडमध्ये त्याने सर्वाधिक 16 तर ऑस्ट्रेलिया, युएई, वेस्ट इंडीज, बांगलादेश या देशांमध्ये प्रत्येकी 2 शतके ठोकली आहेत. तर इंग्लंड, भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेमध्ये प्रत्येकी 1 शतक ठोकलं आहे.

Kane Williamson
Ind vs Aus : ईशानची 'ही' चूक भारतीय संघाला पडली महागात! ऑस्ट्रेलियाला मिळाले इतक्या फुकट धावा; पहा व्हिडिओ

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बांगलादेशने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात सर्वबाद 310 धावा केल्या होत्या. यात सलामीवीर महम्मदुल हसन जॉयने सर्वाधिक 86 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 98 अशी झाली होती. मात्र कर्णधार केन विलियमसन आणि डॅरेल मिचेलने डाव सावरत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. मिचेलने 41 धावा करून कर्णधाराची साथ सोडली.

त्यानंतर केनने ग्लेन फिलिप्सच्या साथीने संघाला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र फिलिप्स 47 धावांचे योगदान देत माघारी फिरला. दरम्यान, शतकी खेळी पूर्ण केल्यानंतर केन विलियमसन देखील बाद झाला. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी किवींनी 8 बाद 266 धावांपर्यंत मजल मारली होती. बांगलादेशकडे पहिल्या डावाज अजूनही 44 धावांची आघाडी आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.