Hardik Pandya Kapil Dev : हार्दिक पांड्याबाबत कायमच भिती वाटते... कपिल देव यांनी व्यक्त केली मोठी चिंता

Hardik Pandya Kapil Dev World Cup 2023
Hardik Pandya Kapil Dev World Cup 2023esakal
Updated on

Hardik Pandya Kapil Dev World Cup 2023 : भारतात होणारा वनडे वर्ल्डकप 2023 हा अवघ्या तीन महिन्यावर आला आहे. आयसीसीने वर्ल्डकपचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केल्यानंतर भारतीय संघाबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. वर्ल्डकप भारतात होत आहे. 2011 चा मायदेशात झालेला वनडे वर्ल्डकप भारताने जिंकला होता. भारतीय संघाने यंदाही वर्ल्डकप जिंकावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

Hardik Pandya Kapil Dev World Cup 2023
World Cup 2023 : ICC वर्ल्ड कपवरुन रोहित पवार राष्ट्रवादीच्या 'त्या' बड्या नेत्याशी भिडले

भारताचे शेवटची आयसीसी ट्रॉफी ही 2013 मध्ये जिंकली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर भारताला प्रत्येक आयसीसी इव्हेंटमध्ये विजेतेपद पटकावण्यात अपयश आले.

त्यामुळे आता दशकभरानंतर तरी भारतीय संघ हा दुष्काळ संपवणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच भारतीय संघाला दुखापतींचे मोठे ग्रहण लागले आहे. याबाबत कपिल देव यांनी आपले मत व्यक्त करताना चिंता व्यक्त केली.

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या वर्षभरापासून पाठदुखीमुळे संघाबाहेर आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल देखील त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करून आता तंदुरूस्तीसाठी घाम गाळत आहेत. तर कार अपघातात मोठी दुखापत झालेला ऋषभ पंत देखील गेल्या सहा महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो वर्ल्डकपपूर्वी फिट होईल असे वाटत नाही.

Hardik Pandya Kapil Dev World Cup 2023
World Cup 2023 : 'वर्ल्डकप ठिकाणांमध्ये राजकारण...' BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे मोठे वक्तव्य

कपिल देव यांना भारतीय संघाच्या दुखापतींचीच चिंता आहे. माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांनी 2023 च्या वर्ल्डकपपूर्वी भारताचे सर्व प्रमुख खेळाडू हे तंदुरूस्त असायला हवे यावर भर दिला. त्यांनी हार्दिक पांड्याच्या दुखापती बाबत देखील भिती व्यक्त केली आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना कपिल देव म्हणाले की, 'एका खेळाडूच्या आयुष्याचा दुखापती हा अविभाज्य भाग असतात. मला आशा आहे की भारतीय संघाला लागलेले दुखापतीचे शुक्लकाष्ठ संपेल. मला कायम हार्दिक पांड्याबाबत भिती वाटते. त्याला लवकर दुखापती होतात. जर हे सर्व खेळाडू फिट असतील तर भारतीय संघ परिपूर्ण आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'वर्ल्डकप हा प्रत्येक 4 वर्षांनी येतोय. त्यामुळे तुम्ही त्यासाठी तयार असलंच पाहिजे. आपल्याला अजून सामन्यांचा सराव हवा, आपल्याला अजून वनडे सामने खेळण्याची गरज आहे.' कपिल देव यांनी कसोटी आणि टी 20 मालिका काही काळ थांबवायला हव्यात असे देखील मत व्यक्त केले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()