Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिका संपली, पण वाद मिटेना; रोहित शर्माने तीन वेळा फलंदाजी केल्यामुळे राडा सुरूच

Karim Janat Says Rohit Sharma Should Not Have Been Allowed To Bat In IND Vs AFG 3rd T20 Second Super Over
Karim Janat Says Rohit Sharma Should Not Have Been Allowed To Bat In IND Vs AFG 3rd T20 Second Super Over sakal
Updated on

India Vs Afghanistan T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका संपली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा व्हाईटवॉश करत मालिका 3-0 ने जिंकली. यासोबतच भारताने टी-20 मालिकेत सर्वाधिक क्लीन स्वीप करण्याचा विश्वविक्रमही केला. ही मालिका संपली असली तरी सुपर ओव्हरमध्ये सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना अतिशय रोमांचक होता. ज्यामध्ये दोन सुपर ओव्हर पाहिल्या मिळाला, आणि शेवटी यजमान संघांनी बाजी मारली. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात ही पहिलीच वेळ आहे जिथे दोन सुपर ओव्हर टाकण्यात आल्या.

Karim Janat Says Rohit Sharma Should Not Have Been Allowed To Bat In IND Vs AFG 3rd T20 Second Super Over
Virat Kohli : हैदराबाद की अयोध्या...; विराट कोहली आता आहे तरी कुठे? व्हिडिओ होतोय व्हायरल

पण सुपर ओव्हरमध्ये काही नियमांकडे 'दुर्लक्ष' करण्यात आले, कारण पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 'रिटायर्ड आऊट/रिटायर्ड हर्ट' झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आला होतो.

या सामन्यादरम्यान अफगाणिस्तानच्या कोणत्याही खेळाडूने अधिकृत तक्रार केली नसली तरी रोहितला पुन्हा फलंदाजी करण्याची परवानगी द्यायला नको होती, असे करीम जनात म्हटला.

Karim Janat Says Rohit Sharma Should Not Have Been Allowed To Bat In IND Vs AFG 3rd T20 Second Super Over
Shoaib Akhtar On Virat Kohli : विराट आमच्या काळात असता तर... शोएब कोहली - तेंडुलकरच्या तुलनेवर स्पष्टच बोलला

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये एका चेंडू भारताला दोन धावांची गरज होती, त्यावेळी रोहित निवृत्त झाला. पण सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर, तो पुन्हा फलंदाजीला आला आणि त्याने फलंदाजीची परवानगी द्यायला हवी होती की नाही यावरून वाद सुरू झाला.

याबद्दल बोलताना अफगाणिस्तानचा खेळाडू करीम जनात म्हणाला की, "आम्हाला याबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या व्यवस्थापनाने पंचांशी चर्चा केली. रोहित फलंदाजीला आला, पण आम्हाला नंतर कळले की त्याला तसे करण्याची परवानगी द्यायला नको होती. तुम्ही निवृत्त झालात तरी परत फलदांजी करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.