भारतासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे.
बंगळुरु (कर्नाटक) : 15 मे रोजी थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकून भारतासाठी इतिहास रचणारा बॅडमिंटनपटू (Badminton Player) लक्ष्य सेन (Lakshya Sen) नुकताच मायदेशी परतलाय. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport Bengaluru) आगमन झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना लक्ष्य सेन म्हणाला, भारतासाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येकजण एक संघ म्हणून एकत्र आले आहेत. फायनलमध्ये पूर्णपणे वेगळं वातावरण होतं. मी पहिल्या गेम गमावल्यामुळं सामन्यात माझी सुरुवात चांगली झाली नाही. मला वाटलं की मी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये खरोखरच गोष्टी बदलणार का. शेवटच्या टप्प्यात मी घाबरलो होतो, पण मी सुरक्षित खेळलो आणि घाई केली नाही, असं त्यानं नमूद केलंय.
दरम्यान, थॉमस चषक (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचा सदस्य लक्ष्य सेनला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सोमवारी राज्य सरकारकडून (Karnataka Government) 5 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित 'मिनी-ऑलिम्पिक स्पोर्ट्स मीट-2022' चे उद्घाटन केल्यानंतर ही घोषणा केलीय.
बोम्मई पुढं म्हणाले, 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा (Paris Olympics 2024) होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून आम्ही विविध खेळांतील 75 खेळाडूंच्या गटाची विशेष प्रशिक्षणासाठी निवड केलीय. थॉमस चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं 14 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाला 3-0 च्या फरकानं पराभूत करून थॉमस चषकावर पहिल्यांदाच नाव कोरलं. आतापर्यंत इंडोनेशियानं (Indonesia) सर्वाधिक 14 वेळा, चीननं 10 वेळा, मलेशियानं 5 वेळा तर, जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकलीय. ज्यानंतर यंदा 2022 साली भारतानं या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत इतिहास घडवला आहे. त्यामुळं ही स्पर्धा जिंकणारा भारत जगातील सहावा देश बनलाय. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं (Indian Badminton Team) सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी केलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.