Karun Nair Tweet After Ishan Kishan Double Century : भारतीय क्रिकेट संघाचा युवा इशान किशनने बांगलादेशविरुद्ध धमाकेदार द्विशतक झळकावले. या खेळीमुळे जगभरातील सर्व चाहत्यांना त्याच्या प्रतिभेची खात्री पटली. दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध त्रिशतक झळकावून इतिहासाच्या पानात आपलं नाव नोंदवणारा टीम इंडियाचा आणखी एक प्रतिभावान फलंदाज संधी मिळावा, अशी याचना करत आहे.
एकीकडे इशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण जग मग्न होते. दुसरीकडे एक आश्वासक फलंदाज ज्याने आपली क्षमता सिद्ध केली होती, आता संधी द्या अशी विनंती करत आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोनच फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतके झळकावली आहेत. एक वीरेंद्र सेहवाग आणि दुसरा करुण नायर. इंग्लंडविरुद्ध अचानक त्रिशतक झळकावून खळबळ माजवणारा करुण आज जवळपास विस्मृतीत गेला आहे.
केरळकडून खेळणाऱ्या करुणने सोशल मीडियावर संधी देण्याची विनंती केली आहे. भारतीय संघातून वगळल्यानंतर या खेळाडूला त्याच्या राज्य कर्नाटक संघातूनही खराब कामगिरीमुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता तो खूप अस्वस्थ आहे आणि या कारणासाठी त्याने ट्विटरवर लिहिले की, प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी द्या.
2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना करुणने त्रिशतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. इंग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या डावात 477 धावा केल्या होत्या. भारताने पहिला डाव 7 गड्यांच्या मोबदल्यात 759 धावा करून घोषित केला. या खेळीदरम्यान सलामीवीर केएल राहुलने 199 धावा केल्या, तर करुण पाचव्या क्रमांकावर आला आणि त्याने त्रिशतक झळकावून इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव नोंदवले. त्याने 381 चेंडूत 32 चौकार आणि 4 षटकारांसह 303 धावा केल्या. या उत्कृष्ट खेळीनंतर त्याला मिळालेल्या सर्व संधीमध्ये तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. करुणने भारतासाठी फक्त 6 कसोटी आणि 2 वनडे खेळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.