Kaun Pravin Tambe : ये तो सिर्फ ट्रेलर है...पिक्चर अभी बाकी

श्रेयस तळपदे साकारताना दिसणार क्रिकेटर प्रविण तांबेची भुमिका
PRAVIN TAMBE
PRAVIN TAMBESakal
Updated on

KAUN PRAVIN TAMBE TRAILER: माजी क्रिकेटर प्रविण तांबे याच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या पूर्वीही अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमे बनवले गेले आहेत. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्या सोबत आता प्रविण तांबेचा ही बायोपिक येणार आहे. क्रिकेटर प्रविण तांबे यांचा संघर्षमय प्रवास या सिनेमाच्या माध्यमातुन लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रविणच्या मुख्य भुमिकेत श्रेयस तळपदे असणार आहे. 'कोन प्रविण तांबे' असे चित्रपटाचे नाव असणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रस्तावनेने आहे. यात श्रेयसचा नविन लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात प्रविणच्या क्रिकेट आणि वैयकेतीक आयुष्याविषयी सांगितले जाणार आहे. 2 मिनिटे 51 सेकंदाचा ट्रेलर आहे. सुरूवातीलाच श्रेयस तळपदे गोलंदाजी करताना दिसत आहे. यात प्रविणचा संघर्ष दाखवला आहे. या सिनेमात वैयक्तिक आयुष्य, नोकरी, टोमणे, लग्न आणि नंतर पत्नीसोबत होणारे वाद या सर्व गोष्टी उलगडणार आहेत.

PRAVIN TAMBE
लहान वयातच आई-वडिलांचं निधन; आता 'हा' खेळाडू बनला Snooker चॅम्पियन

नोकरी करत क्रिकेट खेळण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले यांचा सपूर्ण प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 1 एप्रिलला ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलिज होणार आहे. डिस्नी प्लस हॉस्टारवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रविण तांबे यांचा जन्म 1971 चा आहे. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलमध्ये प्रदार्पण केले होते. गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघात खेळला आहे.

PRAVIN TAMBE
महिला विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाची 5 मोठी कारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.