KC Cariappa : राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूची पोलिसात धाव; एक्स गर्लफ्रेंडने दिली कारकीर्द संपवण्याची धमकी

KC Cariappa
KC Cariappaesakal
Updated on

KC Cariappa Police Complaint : आयपीएलमध्ये आधी केकेआर त्यानंतर पंजाब किंग आणि आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या केसी करिअप्पाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड ही त्याची क्रिकेट कारकीर्द उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने धमकी देत आहे असा आरोप केला आहे.

करिअप्पाने तक्रारीत या महिलेने त्याला अनेकवेळा धमकी दिली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली आहे. करिअप्पाने यापूर्वी देखील या महिलेविरूद्ध तक्रार नोंदवली होती. वर्षापूर्वी याच महिलेने करिअप्पाविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

KC Cariappa
Rohit Sharma On Playing 11 : प्रसिद्ध कृष्णा की मुकेश कुमार... रोहितने कोणाला दिलं झुकतं माप?

कोडागू येथे राहणाऱ्या करिअप्पाने पोलिसांकडे कबूल केलं की या महिलेसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र तिच्या ड्रग आणि दारूच्या व्यसनापायी त्याने तिच्यासोबतचं नातं तोडलं.

त्याने या महिलेला दारू पिण्यापासून परावृत्त करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र तिने काही दारू सोडली नाही. या महिलेने स्वतःचा जीव देण्याची देखील धमकी दिली होती. तिने करिअप्पावर गंभीर आरोप देखील केले होते. दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की करिअप्पाच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे.

करिअप्पाची एक्स गर्लफ्रेंडने 2022 मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने करिअप्पाने तिला गरोदर केलं आणि नंतर गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप केला. या महिलेने करिअप्पाने लग्न करण्याचं वचन दिल्याचा दावा ही केला आहे.

KC Cariappa
Rohit Sharma : रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप खेळण्याबाबत पत्रकार परिषदेत काय म्हणाला?

करिअप्पा हा 2019 मध्ये केकेआरकडून खेळला आहे. शिवम मावी दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघात त्याची वर्णी लागली होती. त्यानंतर 2020 मध्ये केकेआरने त्याला रिलीज केलं. 2021 मध्ये त्याला राजस्थानने आपल्या संघात सामील करून घेतलं. त्याने 2021 च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेद्वारे कर्नाटक संघातून अ श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.