Ranji Trophy: धोनीचा पठ्ठ्या परतलाय; वर्षानंतर केदार जाधवचे धडाकेबाज पुनरागमन

महाराष्ट्राने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात पहिला दिवस आपल्या नावावर केल्या अन्...
kedar jadhav century mumbai vs maharashtra ranji trophy live cricket news
kedar jadhav century mumbai vs maharashtra ranji trophy live cricket news sakal
Updated on

Ranji Trophy 2023 : रणजी क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठायची असेल, तर पहिल्या डावात आघाडी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राने मुंबईविरुद्धच्या या सामन्यात पहिला दिवस आपल्या नावावर केला. यात अनुभवी खेळाडू केदार जाधवने शतकी खेळी साकार केली. त्यामुळे महाराष्ट्राने ६ बाद ३११ अशी मजल मारली.

kedar jadhav century mumbai vs maharashtra ranji trophy live cricket news
IND vs NZ : भारताने किवींकडून हिसकावले अव्वल स्थान; शार्दुलने मोडून काढली कॉन्वेची झुंज

ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईतील गारठा १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचा फायदा आपल्या गोलंदाजांना होईल, ही अपेक्षा होती; परंतु दिवसअखेर खेळ संपता संपता महराष्ट्राने त्रिशतकी धावा आपल्या खात्यात जमा केल्या.

वास्तविक रहाणेचा निर्णय तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी या वेगवान गोलंदाजांनी अचूक ठरवलाही होता. पवन शहाला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यावर नौशाद शेखला १२ धावांवर बाद केले. त्यामुळे महाराष्ट्राची २ बाद २३ अशी अवस्था केली होती; मात्र त्यानंतर मुंबई गोलंदाजांची पकड ढिली होत गेली.

kedar jadhav century mumbai vs maharashtra ranji trophy live cricket news
WFI Controversy: 'आमच्याशी चर्चा न करता क्रीडा खात्याने समिती नेमली'

यंदाच्या मोसमात संधी मिळताच द्विशतक करणाऱ्या केदार जाधवने आपला सर्व अनुभव पणास लावत बघता बघता शतक केले. ही खेळी करत असताना त्याने दुसरा सलामीवीर सिद्धेश वीरसह शतकी भागीदारी केली. केदारने १६८ चेंडूंचा सामना करताना १०८ चेंडू निर्धाव खेळून काढले आणि एकूण १२८ धावा फटकावल्या, याचा अर्थ संयमाबरोबर त्याने संधी मिळताच आक्रणही केले. त्यामुळे ही खेळी त्याने १८ चौकार आणि एका षटकारासह सजवली.

मुंबई गोलंदाजांमध्ये सातत्य नव्हते. सिद्धेश वीर आणि अंतिम बावणे यांना पाठोपाठ बाद केल्यानंतर महाराष्ट्राची ४ बाद १२९ अशी अवस्था केली; परंतु त्यानंतर पुन्हा त्यांची पकड ढिली होत गेली. शतकवीर केदार जाधव बाद झाला, तेव्हा महाराष्ट्राच्या धावफलकावर ६ बाद २२७ धावा जमा झाल्या होत्या; परंतु दिवसाचा खेळ संपता संपता हाच धावफलक ६ बाद ३१४ असा भक्कम झाला. याचे श्रेय सौरभ नवलेच्या नाबाद अर्धशतकाला जाते.

kedar jadhav century mumbai vs maharashtra ranji trophy live cricket news
Shardul Thakur : शार्दुल नेहमीच असं करतो म्हणून आम्ही त्याला... रोहित 'लॉर्ड'बद्दल हे काय बोलला?

संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र, पहिला डाव ः ८७ षटकांत ६ बाद ३१४ (पवन शहा ०, सिद्धेश वीर ४८, नौशाद शेख १२, केदार जाधव १२८ -१६८ चेंडू, १८ चौकार, १ षटकार, अंकित बावणे १, अझीम काझी २९, सौरभ नवले खेळत आहे ५६ -६७ चेंडू, ९ चौकार, अक्षय पालकर खेळत आहे ३२, तुषार देशपांडे २०-७-६४-२, मोहित अवस्थी १८-३-७०-२, शम्स मुलानी २६.५-१-१०५-२, तनुष कोटियन ३.१-१-५-०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.