हा कसला आंतरराष्ट्रीय T20I सामना? 3 षटकात 'खतम, बाय-बाय, टाटा...'

Kenya Defeat Cameroon T20I
Kenya Defeat Cameroon T20I ESAKAL
Updated on

Kenya Vs Cameroon T2OI : सध्या झटपट क्रिकेट सामन्यांच युग आहे. क्रिकेटचा प्रवास हा 5 दिवसांच्या कसोटीपासून आता 100 चेंडूपर्यंत आला आहे. सध्या क्रिकेट जगतात टी 20 क्रिकेटची मोठी क्रेज पहावयास मिळत आहे. हा सामना जवळपास तीन तास रंगतो. मात्र एक आंतरराष्ट्रीय टी 20 सामना हा फक्त 3.2 षटकात म्हणजे 20 चेंडूत संपवण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना केनिया आणि कॅमेरून या दोन देशात खेळला गेला. (Kenya Defeat Cameroon In International T20I Match in 20 balls)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कॅमेरूनने 14.2 षटकात सर्वबाद 48 धावाच केल्या. केनियाकडून यश तालातीने 8 धावात 3 विकेट घेतल्या. तर शेम नोचेने 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. लुकाने 2 विकेट आणि गेरार्डने 1 विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली.

Kenya Defeat Cameroon T20I
Sunil Gavaskar : पंत की कार्तिक; गावसकर म्हणतात, धोका पत्करल्याशिवाय...

यानंतर कॅमेरूनच्या 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केनियाने हे आव्हान फक्त 3.2 षटकात 1 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. रूशब पटेलने 14 तर सुखदीप सिंहने 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. नेहेमिआहने नाबाद 7 धावा करत सामना 3.2 षटकात संपवला.

Kenya Defeat Cameroon T20I
India Vs Pakistan : भारत - पाक सामन्यानंतर अजूनही इंग्लंडमध्ये तणावपूर्ण वातावरण

जरी केनियाने कॅमेरूनचा तब्बल 100 चेंडू राखून पराभव केला असला तरी हे काही वर्ल्ड रेकॉर्ड नाही. ते या बाबतीत चौथ्या स्थानावर आहेत. यापूर्वी ऑस्ट्रियाने तुर्कस्तानवर 104 चेंडू आणि 10 वकेट्स राखून विजय मिळवला होता. यानंतर ओमानचा नंबर लागतो. त्यांनी फिलिपिन्सविरूद्ध 103 चेंडू आणि 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता. तर लक्सेम्बर्गने देखील तुर्कस्तानचा 101 चेंडू आणि 8 विकेट्सनी पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.