'जडेजाची कॉपी करा'; पीटरसनचा इंग्लंडच्या युवा खेळाडूंना सल्ला

जर तुम्ही लहान असाल, उभारते खेळाडू असाल, काउंटी क्रिकेटर असाल किंवा कुणीही तुम्ही जडेजाला कॉपी करू शकता. कारण जडेजा सुपरस्टार आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaFile photo
Updated on
Summary

जर तुम्ही लहान असाल, उभारते खेळाडू असाल, काउंटी क्रिकेटर असाल किंवा कुणीही तुम्ही जडेजाला कॉपी करू शकता. कारण जडेजा सुपरस्टार आहे.

लंडन : इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनने (Kevin Pietersen) टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं (Ravindra Jadeja) तोंडभरून कौतुक केलं आहे. पीटरसनने युवा खेळाडूंना जडेजाचं अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. इंग्लंड क्रिकेट टीमलाही जडेजासारख्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज आणि तळात फलंदाजी करणाऱ्या खेळाडूची गरज आहे. (Kevin Pietersen said to look up to and emulate star India all-rounder Ravindra Jadeja)

बीटवे इनसाइडरवरील आपल्या ब्लॉगमध्ये पीटरसनने लिहिले आहे की, “इंग्लंड संघात आंतरराष्ट्रीय स्तराचा एकही डावखुरा फिरकीपटू नसल्याने मला निराशा वाटते. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेट, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये २२० तर मर्यादित षटकांच्या सामन्यात २२७ बळी घेतले आहेत. तसेच त्याची कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीची सरासरी ३६.१८ वर पोहोचली आहे. तो त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. पीटरसनचा असा विश्वास आहे की, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या दिशेने काम केले पाहिजे. डावखुऱ्या गोलंदाजांना प्राथमिकता द्यायला हवी.

Ravindra Jadeja
न्यूझीलंडच्या पठ्ठ्यांची गोलंदाजी टीम इंडियाची झोप उडवणारी

पीटरसन म्हणाला की, जर तुम्ही लहान असाल, उभारते खेळाडू असाल, काउंटी क्रिकेटर असाल किंवा कुणीही तुम्ही जडेजाला कॉपी करू शकता. कारण जडेजा सुपरस्टार आहे. इंग्लंड टीममध्ये जॅक लीच आणि डॉम बेस हे फिरकीपटू आहे. स्वान आणि माँटी पानेसरच्या निवृत्तीनंतर इंग्लंडला एका चांगल्या फिरकीपटूची गरज आहे. लीच आणि बेस हे टेस्ट क्रिकेटमधील फिरकीपटू नाही. मी दोन वर्षापूर्वीही हेच म्हटलो होतो आणि दुर्दैवाने माझी गोष्ट खरी ठरली.

Ravindra Jadeja
गुगली टाकायला बायकोनं शिकवलं! राशिदनं घेतली युजीची फिरकी

दरम्यान, जडेजाने आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये १९५४ धावांसह २२० बळी घेतले आहेत. वनडेमध्ये १६८ सामन्यात २४११ धावांसह १८८ बळी तर ५० टी-२० सामन्यात २१७ धावांसह ३९ बळी घेतले आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी जडेजा टीम इंडियासह सध्या इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे आहे. १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्याला सुरवात होणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.