'भारतात यायचंय पण...' पिटरसनने मोदींना टॅग करताच आयकर विभाग मदतीला

Kevin Pietersen tag PM Narendra Modi for PAN Card Issue
Kevin Pietersen tag PM Narendra Modi for PAN Card Issue esakal
Updated on

भारतात फक्त भारतीय क्रिकेटपटूच प्रसिद्ध आहेत असे नाही. तर काही विदेशी खेळाडू देखील भारतात चांगलेच प्रसिद्ध आहेत. मध्यंतरी प्रजासत्ताक दिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाच भारतात प्रसिद्ध असलेल्या परदेशी क्रिकेटपटूंना पत्र लिहिली होती. आता त्यातीतलच एक प्रसिद्ध खेळाडूने भारतीयांकडून मदत मागितली. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने (Kevin Pietersen) त्याचे पॅन कार्ड (PAN Card) हरवल्याने भारतीयांकडून मदत मागितली होती. या ट्विटला त्याने नरेंद्र मोदींनी देखील टॅग केले होते.

Kevin Pietersen tag PM Narendra Modi for PAN Card Issue
VIDEO: राजस्थान रॉयल्सने संगकाराचा केला धर्मेंद्र, संजू बनला शाहरूख

भारताच्या प्रेमात असलेल्या केविन पिटरसन काही दिवसात भारतीय दौऱ्यावर येणार आहे. मात्र त्याचे भारतीय पॅन कार्ड गहाळ झाल्याने त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत ट्विट केले. याची दखल इन्कम टॅक्स (Income Tax Department) विभागाने देखील तत्परता दाखवत लगेचच त्याला एक लिंक शेअर करत त्याच्या समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

पिटरसनने 'माझे पॅन कार्ड गहाळ झाले आहेत आणि मी सोमवारी भारतात येतोय. पण, मला माझ्या पॅनकार्डची हार्ड कॉपी काही कामानिमित्त हवी आहे. ती कशी मिळवायची याबद्दल मला कोणी मार्गदर्शन करू शकेल का? असे ट्विट केले होते.

Kevin Pietersen tag PM Narendra Modi for PAN Card Issue
विराट - रोहितमध्ये पहिल्या टी 20 सामन्यात 'या' रेकॉर्डसाठी होणार फाईट

याला इन्कम टॅक्स विभागाने त्वरित उत्तर दिले. त्यांनी 'आम्ही तुझी मदत करण्यात तत्पर आहोत. तू तुझ्या पॅन कार्डची माहिती आम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन भर. तथून तू तुझ्या पॅनकार्डची अजून एक कॉपी मागवू शकतो.' असे ट्विट केले. पिटरसननेही त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.