India vs Pakistan: "नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​धोका, आमच्या टीमला सुरक्षा द्या"; पाक सरकारची भारताकडे मागणी

India vs Pakistan
India vs Pakistan
Updated on

India vs Pakistan: आज (गुरुवार) भारतात आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ ला सुरुवात झाली आहे. जगातील अनेक संघ भारतात दाखल झाले असून पाकिस्तानचा संघ देखील भारतात आला आहे. दरम्यान पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कथित दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने भारत सरकारकडे ही मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. भारत सरकारने आमच्या संघाला सुरक्षा प्रदान केली पाहीजे. अनुकूल वातावरण निर्माण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असे मुमताज झहरा बलोच यांनी म्हटले आहे.

कुणी दिली धमकी?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत पन्नू याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या विश्वचषक सामन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. निज्जर याच्या हत्येसाठी पंतप्रधान मोदी जबाबदार असून शिख फॉर जस्टिस या हत्येचा बदला घेणार असल्याचे दहशतवादी पन्नूने व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे.

India vs Pakistan
Sharad Pawar: 'चिंता नको, 5 वेळा वेगवेगळ्या चिन्हावर लढलोय आणि जिंकलोय; शरद पवारांनी केलं सूचक वक्तव्य

खलिस्तानवाद्यांच्या सामन्यात अडचणी निर्माण करण्याच्या धमक्यांमुळे गुजरात पोलिस आणि केंद्रीय यंत्रणां सतर्क झाल्या आहेत.  नरेंद्र मोदी स्टेडियमवर दहशतवादी धोका लक्षात घेता.भारतीय अधिकाऱ्यांनी सुरक्षा तयारी वाढवली आहे. 3 हजारहून अधिक पोलिस कर्मचार्‍यांना घटनास्थळी आणि आसपास तैनात केले आहे. (Latest Marathi News)

India vs Pakistan
Sharad Pawar : राष्ट्रवादीने उद्याच्या सुनावणीसाठी केली खास तयारी; त्याआधी दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात घोषणाबाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.