First Olympic individual Medalist Khashaba Jadhav son Ranjit Jadhav reaction
First Olympic individual Medalist Khashaba Jadhav son Ranjit Jadhav reactionesakal

'खाशाबा जाधवांसाठी आता मोदी - शहांना भेटायचं तेवढं राहिलंय'

Published on

सातारा : भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (73rd Republic Day) पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Award) घोषणा केली. मात्र स्वातंत्र्यानंतर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या कै. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या नातेवाईकांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली. अनेक नेत्यांकडे, मंत्र्यांकडे पाठपुरावा करून, मोशल मीडियावर मोहिम राबवून देखील सरकारने दुर्लक्ष केले. याबाबत खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव (Khashaba Jadhav son Ranjit Jadhav) यांनी खेद व्यक्त केला आहे. (First Olympic individual Medalist Khashaba Jadhav son Ranjit Jadhav reaction)

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav son Ranjit Jadhav reaction
73 व्या प्रजासत्ताक दिनीही उपेक्षाच; खाशाबा जाधवांना सरकार पुन्हा विसरलं

त्यांनी सकाळ समुहाशी बोलताना आपले दुःख बोलून दाखवले. ते म्हणाले 'अतिशय खेदजनक निर्णय आहे. तथाकथित नेतेमंडळींकडे २० वर्षांपासून हेलपाटे मारले. तरीही त्यांना कळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. खाशाबांसाठी आता कुणाकडे जायचं. आता मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे जायचं राहिलंय.'

रणजित जाधवांना पद्म पुरस्काराचं (Padma Award) घोडं कुठं अडलंय असे विचारल्यावर त्यांनी 'का होत नाही कळलं नाही. इतके वर्षे प्रयत्न करतोय पण अपेक्षा होती की पुरस्कारापासून का वंचित ठेवलंय हे तरी त्यांनी सांगायला हवं होतं. याबाबत कोणतही स्पष्टीकऱण देण्यात आलेलं नाही. त्यांचा जीआर आहे की एखादी व्यक्ती महत्तम कार्य करते तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी, भागातील नेत्यांनी त्यासाठी पाठ पुरावा करायला हवा. खाशाबांचे निधन (Khashaba Jadhav Death) झाले तेव्हा १९८४ मध्ये 58 व्या वर्षी झाले. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो, मला जेव्हा समजायला लागलं तेव्हा आम्ही प्रयत्न करायला लागलो. २००१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार (Arjun Award) देण्यात आला. पण अद्याप पद्म पुरस्कार मात्र मिळू शकला नाही.' अशी प्रतिक्रिया दिली.

First Olympic individual Medalist Khashaba Jadhav son Ranjit Jadhav reaction
'खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार द्या';पाहा व्हिडिओ

निराश झालेले रणजित जाधव पुढे म्हणाले की, 'आता या प्रकरणी याचिका दाखल करायची वेळ आली नाही म्हणजे बरं! एका सर्वोच्च व्यक्तीनं त्याग करून देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. तो येत्या पिढीसाठी आदर्शाचा केंद्रबिंदू मानला जायला हवा होता. आपली जबाबदार नेतेमंडळी काय करतात असा प्रश्न माझ्यापुढे पडलाय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.