Anurag Thakur : 'या' खेळाडूंना मिळणार सरकारी नोकऱ्या अन् प्रमोशन! क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम क्रीडा इकोसिस्टम आणि तळागाळातील क्रीडा प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या दूरदृष्टीच्या धोरणानुसार आणि खेळाडूंना खेळाडूंना करियरचा मार्ग खुला करण्याच्या विचारांनुसार.....
Anurag Thakur Marathi News
Anurag Thakur Marathi Newssakal
Updated on

खेलो इंडिया स्पर्धांमध्ये पदक विजेते सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र ठरतील, नव्या धोरणानुसार हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Anurag Thakur Marathi News
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत केली 'ही' मोठी कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम क्रीडा इकोसिस्टम आणि तळागाळातील क्रीडा प्रतिभेचे पालनपोषण करण्याच्या दूरदृष्टीच्या धोरणानुसार आणि खेळाडूंना खेळाडूंना करियरचा मार्ग खुला करण्याच्या विचारांनुसार सरकारी नोकऱ्यांचा हा पर्याय तयार करण्यात आल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

Anurag Thakur Marathi News
Ind vs Eng : पाचव्या कसोटीसाठी संघाची घोषणा! खेळपट्टीचा रंग पाहून केला मोठा बदल

विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्या देण्यात येत होत्याच आता आम्ही खेलो इंडिया, युवा विद्यापीठ स्पर्धा, पॅरा आणि हिवाळी स्पर्धांतील विजेत्यांसाठीही नोकऱ्यांचा मार्ग तयार केला आहे, असे ठाकूर यांनी `एक्स`वर म्हटले आहे.
केंद्र सरकारचे हे नवे पाऊल भारत खेळाच्या क्षेत्रात सुपर पॉवर होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

Anurag Thakur Marathi News
Ind vs Eng R Ashwin : “मी इतके फोन केले पण...” 100 व्या कसोटीआधी माजी खेळाडूने अश्विनवर केले गंभीर आरोप

ग्रासरुटमध्ये क्रीडा संस्कृती जागवण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना स्फूर्ती तसेच स्पर्धांचे नवे दालन उभे करण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ मध्ये खेलो इंडिया हा उपक्रम मोदी सरकारने सुरु केला. या स्पर्धांना आता भरभरून पाठींबा मिळत आहे. देशातील गुणवत्ता प्राकर्षाने पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.