Khelo India 2024 : तब्बल 158 पदकांची कमाई; 'क्रीडा राज्य' हरियाणापेक्षाही महाराष्ट्र भारी

Khelo India Youth Game 2024 : महाराष्ट्राने केली 57 सुवर्णांसह 158 पदकांची कमाई
Khelo India Youth Game 2024 Maharashtra
Khelo India Youth Game 2024 Maharashtra esakal
Updated on

Khelo India Youth Game 2024 Maharashtra

चेन्नई : महाराष्ट्रने सलग दुसऱ्या वर्षी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्राने खेलो इंडियाचं मैदान मारत तब्बल 57 सुवर्ण पदकांवर आपलं नाव कोरलं. याचबरोबर महाराष्ट्रातील युवा खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात 48 रौप्य आणि 53 कांस्य पदके देखील पटकावली.

महाराष्ट्राची एकूण पदक संख्या ही 158 इतकी झाली. आतापर्यंत झाेलेल्या सहा खेलो इंडिया स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने तब्बल 4 वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. तर खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणा राज्याने दोनवेळा हा मान पटकावला आहे.

Khelo India Youth Game 2024 Maharashtra
India Vs England Sarfaraz Khan : सरफराज खान दुसऱ्या कसोटीत खेळणार...? प्रशिक्षक स्पष्टच बोलले

यंदाचे खेलो इंडिया हे तामिळनाडूमध्ये झाले. त्यांनी घरच्या मैदानावर खेळण्या फायदा उचलत 38 सुवर्ण पदके, 21 रौप्य आणि 39 कांस्य पदके जिंकत उपविजेतेपद पटकावलं. त्यांची एकूण पदक संख्या ही 98 इतकी होती. हरियाणाने एकूण 103 पदकं जिंकली होती. मात्र त्यांची सुवर्ण पदकांची संख्या फक्त 35 असल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी एकूण ९८ पदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागश्र. त्यांनी ३५ सुवर्ण, २२ रौप्य व ४६ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची कमाई केली.

महाराष्ट्राने जलतरणमध्ये जिंकली सर्वाधिक पदके

  • जलतरण - 11 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य - एकूण 27 पदके.

  • जिम्नॅस्टिक्स - 9 सुवर्ण - एकूण 17 पदके

  • कुस्ती - 4 सुवर्ण - एकूण 14 पदके

  • अॅथलेटिक्स - एकूण 12 पदके

  • योगासन - एकूण 11 पदके.

Khelo India Youth Game 2024 Maharashtra
Manju Rani : चालण्यात भारी 'मंजू राणी'; 10KM शर्यतीत जिंकले सुवर्णपदक! पॅरिस ऑलिंपिकमध्ये मिळणार संधी?

जलतरणामध्ये दोन्ही गटात सांघिक विजेतेपद

जलतरणामध्ये महाराष्ट्राने मुले आणि मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकाविले. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने यंदाच्या स्पर्धेतील ५० मीटर फ्रिस्टाईल शर्यत २४.२२ सेकंदात पार केली. याचबरोबर स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठ त्याने महाराष्ट्राला रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या सुवर्णपदकांची संख्या पाच केली.

ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत आणि सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर फ्रिस्टाईल रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे ३५.५२ सेकंदात पूर्ण केली.

मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकर हिने २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक जिंकताना दोन मिनिटे २६.९१ सेकंद वेळ नोंदवली. तिची सहकारी अलिफिया धनसुरा हिने ५० मीटर्स फ्रिस्टाईल शर्यत २७.०७ सेकंदात पार केली आणि सुवर्ण पदक जिंकले. हिबा चौगुले हिने ५० मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना ३४.९४ सेकंद वेळ नोंदविली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.